AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today | डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर…

शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये देखील घसरण झाल्याने शुक्रवारी (23 एप्रिल) सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) वधारल्या आहेत.

Gold Price Today | डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर...
सोन्या चांदीच्या किंमती
| Updated on: Apr 23, 2021 | 11:35 AM
Share

मुंबई : शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये देखील घसरण झाल्याने शुक्रवारी (23 एप्रिल) सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) वधारल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), जून वायदा सोन्याच्या किंमतीत (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 0.32 टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही तेजी आली आहे. मे वायदा चांदीची किंमत (Silver Price) प्रति किलो 0.25 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.83 टक्क्यांनी घसरले होते, तर चांदीचे दर 0.6 टक्क्यांनी खाली आले होते (Gold Silver Price Today on 23 April 2021 MCX rates).

सोन्याचा भाव (Gold Price on MCX) : मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून वायदा सोन्याची किंमत 82 रुपयांनी वाढून 47,927 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे भाव 0.2 टक्क्यांनी वधारून ते 1,787.11 डॉलर प्रति औंस झाले आहेत. या आठवड्यात सोन्यात 0.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चांदीचा भाव (Silver Price on MCX) : शुक्रवारी एमसीएक्सवर मे वायदा चांदीची किंमत 171 रुपयांनी वाढून 69,389 रुपये प्रति किलो झाली आहे.

का मिळाली सोन्याला गती?

जागतिक बाजारपेठेत अमेरिकेच्या ट्रेझरी यील्ड्समध्ये कमजोरी आणि अमेरिकन डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय जागतिक शेअर बाजारात देखील घसरण झाल्यामुळे सोन्याला गती मिळाली आहे.

गुरुवारी स्पॉट मार्केटमधील सोन्या-चांदीच्या किंमती

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव 168 रुपयांनी घसरले आणि प्रति 10 ग्राम पातळीवर 47,450 रुपयांवर बंद झाले. चांदी 238 रुपयांनी वाढून 69117 रुपयांवर बंद झाली (Gold Silver Price Today on 23 April 2021 MCX rates).

या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता.

परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने 1,800 डॉलरच्या पातळीवर पोहोचले.

स्पॉट गोल्ड 1,797.67 डॉलर दोन महिन्यांच्या उच्चांक पातळी गाठल्यानंतर 1,793.32 डॉलर प्रति औंसवर स्थिर होते. दोन दिवसानंतर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल लागण्याची प्रतीक्षा सोन्याचे व्यापारी करत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह पॉलिसीची बैठकही पुढच्या आठवड्यात होणार आहे.

(Gold Silver Price Today on 23 April 2021 MCX rates)

हेही वाचा :

सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर हे 3 पर्याय येतील कामी; दुप्पट फायदा मिळणार

Gold price today: सोने पुन्हा एकदा झालं स्वस्त, पटापट जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.