Bisleri : बिसलेरी घालणार धुमाकूळ, जयंती चौहान दिग्गजांना पाजणार ‘पाणी’?

Bisleri : बिसलेरी विक्रीची पूर्ण तयारी झालेली असताना स्टोरीत अचानक ट्विस्ट आला. आता तर बिसलेरीने आता तर मोठा डाव मांडला आहे. त्यात भलभल्या कंपन्यांचा पाडाव होण्याची शक्यता आहे..

Bisleri : बिसलेरी घालणार धुमाकूळ, जयंती चौहान दिग्गजांना पाजणार 'पाणी'?
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 10:48 AM

नवी दिल्ली : भारतात चिल्ड बाटलीबंद पाण्याचे युग आणणारी बिसलेरी (Bisleri) डाव खेळणार आहे. त्यात ही कंपनी दिग्गजांना पाणी पाजणार आहे. अवघ्या सहा महिन्यापूर्वी ही कंपनी पूर्णपणे विक्रीच्या तयारीत होती. पण नशीबाचे फासे असे पटापट पलटले की, आता ही कंपन्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांना बाजारात टफ फाईट देण्याच्या तयारीत आहे. बिसलेरी आणि टाटा समूहाची डील जवळपास अंतिम टप्प्यात पोहचली आणि त्यात जयंती चौहान (Jayanti Chauhan) यांच्या एंट्री नंतर सर्वच काही बदलून गेले. अधिग्रहण थांबले. करार मोडला. आता बिसलेरी बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

शीतपेय बाजारात एंट्री बिसलेरी इंटरनॅशनलने शीतपेय बाजारात आग लावण्याची तयारी केली आहे. बिसलेरी, कोका-कोला, पेप्सी, स्प्राईट आणि रिलायन्सने अधिग्रहीत केलेल्या ब्रँड्सला तगडी फाईट देईल. कार्बोनेटेड पेयाच्या बाजारात कंपनीने विस्तार योजना आखली आहे. मंगळवारी कंपनीने याविषयीची घोषणा केल्यानंतर बाजारात आग लागली. देशात कोल्ड ड्रिंक्सची मागणी जोरात आहे. दरवर्षी हा बाजार बहरत आहे. त्याचाच फायदा बिसलेरी उठवेल. कंपनी तीन नवीन फ्लेवरसह बाजारात उतरेल.

ही चव रेंगाळेल बिसलेरी कंपनीच्या तीन फ्लेवर विषयी खूप उत्सुकता आहे. यामध्ये Rev, POP आणि Spyci Jeera Jeera या ब्रँडचा समावेश आहे. बादलीबंद पाण्यासोबतच कंपनी शीतपेय बाजारात पण आहे. कंपनी लिमोनाटा ब्रँडअंतर्गत कार्बोनेटेड ड्रिंकची विक्री करते. ग्राहकांना फिज कोला, ऑरेंज, लेमन आणि जीरा श्रेणीतील फ्लेवरचा स्वाद चाखता यावा यासाठी कंपनी आता पूर्ण जोशाने बाजारात उतरणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंपन्यांना टफ फाईट देशात कोल्ड्रिंक्स मार्केट खूप मोठं आहे. दरवर्षी हा बाजार बहरत आहे. त्याचाच फायदा बिसलेरी उठवेल. कंपनी तीन नवीन फ्लेवरसह बाजारात उतरेल. कोका-कोला, पेप्सी, स्प्राईट आणि रिलायन्सच्या कम्पा कोलाला बिसलेरी बाजारात टफ फाईट देईल. त्यासाठीची तयारी कंपनीने केली आहे.

जयंती चौहान यांच्या हाती कारभार टाटासोबत करार पूर्ण न झाल्याने जयंती चौहान यांनी बिसलेरीचा कारभार स्वतःकडे घेतला. त्यांनी बिसलेरीला आता मॉडिफाय करण्याचा चंग बांधला असून त्यातंर्गत अनेक योजना बाजारात आणण्यात येत आहे. कोल्ड ड्रिंक मार्केटमध्ये जोरदार एंट्रीसाठी तयारी झाली आहे. अभिनव कल्पनांद्वारे तरुण आणि कोल्ड्रींक्स वापरकर्त्यांना आकर्षित करण्यात येत आहे.

बिसलेरीचा शेअर मोठा बाटलीबंद मिनरल वॉटर मार्केटमध्ये बिसलेरीचा दबदबा आहे. बिसलेरीचा भारतीय बाजारात 60 टक्के वाटा आहे. बिसलेरीच्या संकेतस्थळानुसार, जयंतीलाल चौहान यांनी 1949 मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स तयार करणारी पारले समूहाची स्थापना केली होती. त्यांनी 1969 मध्ये इटलीतील एका उद्योजकाकडून बिसलेरी खरेदी केली होती. सध्या कंपनी हँड सॅनिटायझरही तयार करत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.