जेट एअरवेजला उड्डाणाचा परवाना मिळाला, ‘या’ महिन्यापासून सुरू होणार व्यवसायिक उड्डाणे

जेट एअरवेज आता लवकरच व्यवसायिक उड्डाणांना सुरुवात करू शकते. उड्डाणांसाठी आवश्यक असलेला परवाना कंपनीला देण्यात आला आहे.

जेट एअरवेजला उड्डाणाचा परवाना मिळाला, 'या' महिन्यापासून सुरू होणार व्यवसायिक उड्डाणे
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 9:23 AM

मुंबई : जेट एअरवेज (Jet Airways) आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. जेट एअरवेजला व्यवसायिक उड्डाणे (Commercial flights) सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना डीजीसीएकडून (DGCA) देण्यात आला आहे. व्यवसायिक परवाना मिळाल्याने आता लवकरच जेट एअरवेज उड्डाणांना सुरुवात करण्याची शक्यता आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वतीने शुक्रवारी कंपनीला एक ऑपरेटर प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्रानंतर कंपनीचा उड्डानाचा मार्ग मोकळा झाला आहे. जेट एअरवेजला उड्डाणासाठी परवानगी मिळाली आहे. जेट एअरवेज या विमान कंपनीचा प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात मोठा दबदबा होता. मात्र कंपनी तोट्यात गेल्याने अखेर 2019 पासून जेट एअरवेजचे सर्व उड्डाणे बंद झाले. त्यानंतर झालेल्या व्यवहारात जालन-कॅलरॉक कन्सोर्टियम यांनी ही कंपनी खरेदी केली.

एअर ऑपरेटर प्रमाणपत्र म्हणजे काय?

एअर ऑपरेटर प्रमाणपत्र हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वतीने जारी करण्यात येते. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विमानाची उड्डाण टेस्ट घेतली जाते. या टेस्टमध्ये डीजीसीएचे अधिकारी देखील विमानात असतात. या अधिकाऱ्यांकडून सर्व गोष्टींची खात्री करण्यात येते. यामध्ये अनेक गोष्टी तपासल्या जातात. त्यानंतर संबंधित कंपनीला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र देण्यात येते. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित कंपनी व्यवसायिक प्रवाशी वाहतुकीला सुरुवात करू शकते. दरम्यान एअर ऑपरेटर प्रमाणपत्रासोबतच जेट एअरवेजला गृह मंत्रालयाकडून सुरक्षेशी संबंधित सर्व परवानग्या देखील मिळाल्या असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

जुलै ते सप्टेंबरदरम्यान उड्डाणाची शक्यता

जेट एअरवेजला उड्डानासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या आता मिळाल्या आहेत. गृह मंत्रालयाकडून देखील सुरक्षेशी संबंधित सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. कंपनी पुढील तिमाहिती म्हणजे जुलै ते सप्टेंबरदरम्यान कधीही उड्डाण सेवेला प्रारंभ करू शकते अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. लवकरच उड्डाणाच्या दृष्टीने कंपनी नियोजन करणार असून, जेट एअरवेज प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यास विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्याचा प्रवाशांना फायदा होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.