5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवताना ही बाब लक्षात घ्या, नेमके महत्त्वाचे काय?

| Updated on: Jul 27, 2021 | 10:44 AM

जर आपल्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असेल आणि आपण त्याचे आधार कार्ड बनवू इच्छित असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट्स आहेत.

5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवताना ही बाब लक्षात घ्या, नेमके महत्त्वाचे काय?
Aadhaar Number
Follow us on

नवी दिल्लीः आधार कार्ड हे फक्त आपल्यासाठीच नाही, तर आपल्या मुलांसाठी देखील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. जर आपल्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असेल आणि आपण त्याचे आधार कार्ड बनवू इच्छित असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट्स आहेत. आधार देणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) याबाबत माहिती दिलीय.

नवीन जन्मलेल्या मुलासाठी आधार कार्डदेखील बनवता येणार

यूआयडीएआयने सोमवारी ट्विट करून यासंदर्भात सांगितलेय. आधार बनवताना त्या व्यक्तीची अनेक प्रकारची माहिती गोळा केली जाते. यात त्यांची डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहिती असते. आता नवीन जन्मलेल्या मुलासाठी आधार कार्डदेखील बनवता येणार आहे.

5 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी या दोन्ही माहिती अपडेट्स करणे अनिवार्य

आधार तयार करताना 5 वर्षांखालील मुलांची बायोमेट्रिक माहिती गोळा केली जात नाही, असे यूआयडीएआयने सोमवारी ट्विट केले. बायोमेट्रिक माहितीमध्ये मुलाचे फिंगरप्रिंट आणि त्यांचे डोळे स्कॅन करावे लागतात. 5 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी या दोन्ही माहिती अपडेट्स करणे अनिवार्य आहे. मुलांचे वय पाच वर्षापेक्षा कमी असेल तेव्हा बोटाचे स्कॅन केले जाते. जेव्हा मुलाचे वय 5 ते 15 वर्षांच्या दरम्यान असते, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिकच्या आधारावर अद्ययावत केले जाऊ शकते.

घर बसल्या आधारसाठी अर्ज कसा करावा?

स्‍टेप 1: यासाठी प्रथम आपल्याला यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर नंतर आपल्याला आधार कार्ड नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल.

स्‍टेप 2: येथे मुलाचे नाव, पालकांचे नाव यासह बरीच महत्त्वाची माहिती भरावी लागेल. तुम्हाला आधार नोंदणी फॉर्म देखील भरावा लागेल.

स्‍टेप 3: या टप्प्यात आपण निवासी पत्ता, परिसर, जिल्हा / शहर, राज्य इत्यादीचा तपशील भराल.

स्‍टेप 4: नंतर अपॉइंटमेंट बटणावर क्लिक करा आणि आधार कार्ड नोंदणीचे वेळापत्रक निवडा. आपण आपल्या घराच्या जवळील नोंदणी केंद्र निवडू शकता.

स्‍टेप 5: नियुक्तीच्या तारखेला आपण नोंदणी केंद्रास भेट द्यावी. येथे आपल्याला मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पालकांच्या आधार कार्डाची प्रत आणि संदर्भ क्रमांक देखील सोबत घ्यावा लागेल.

स्‍टेप 6: नावनोंदणी केंद्र सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल, त्यानंतर बायोमेट्रिक माहिती मुलाच्या आधार कार्डशी जोडली जाईल. केवळ 5 वर्षांखालील मुलाचे छायाचित्र नोंदणीकृत आहे.

स्‍टेप 7: सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देखील, अर्जदारास एक पावती क्रमांक दिला जातो, ज्याच्या मदतीने आपण अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

स्‍टेप 8: नोंदणीकृत मोबाईल नंबरवर 60 दिवसांनंतर एक एसएमएस प्राप्त होईल. नावनोंदणी प्रक्रियेच्या 90 दिवसांच्या आत बाल आधार तुम्हाला पाठविला जाईल.

संबंधित बातम्या

ATM मधून पैसे काढण्यासाठी नियम बदलले, सरकारने संसदेत सांगितले; Free Transaction कितीदा करता येणार

आपण दरमहा संपूर्ण क्रेडिट कार्ड मर्यादा खर्च करता? मोठे नुकसान जाणून घ्या…

Keep this in mind when making Aadhar cards for children below 5 years of age, what exactly is important?