क्षेत्र कोणतेही असो महिला या सर्वात पुढे आपल्याला दिसतात. मात्र, एक काळ होता, ज्यामध्ये मुल आणि चूल या गोष्टींशिवाय मुलींनी इतर काही करावे, अशी कोणाचीच इच्छा नव्हती. नोकरी करणे घराबाहेर पडणे हे स्वप्न सुद्धा महिलांना बघण्याचा अधिकार नव्हता. आजच्या घडीत पुरूषांप्रमाणे महिला प्रत्येक क्षेत्रात काम करतात. काही घरांमध्ये, मुलींना शिक्षण देणे हे अजूनही एक दूरचे स्वप्न मानले जाते. प्राची पोद्दार यासर्व गोष्टींवर मात करून पुढे आल्या आहेत. त्या एका मारवाडी कुटुंबातून येतात जिथे महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात नव्हते. 2001 मध्ये, प्राची यांची आयआयएम बंगळुरूमध्ये निवड झाली. मात्र, कुटुंबियांचे स्पष्ट म्हणणे होते की, अभ्यास नंतर पण केला जाऊ शकतो पण लग्न आताच झाले पाहिजे. पण अनेक प्रयत्नांनंतर प्राची यांना आयआयएममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली, पण एका अटीवर.. शिक्षण पूर्ण होताच त्यांना लग्न करावे लागेल. प्राची यांनी ती अट मान्य केली पण आपले स्वप्न जीवंत ठेवले.
लग्न केले पण आपली शिक्षणाची जिद्द ठेवली कायम
प्राची यांचा कल सुरूवातीपासूनच वित्त विभागाकडे होता. महाविद्यालयाच्या काळात गणित आणि लेखांकनाकडे त्या आकर्षिक झाल्या. सुरूवातीला यामुळेच त्यांनी व्यवस्थापन विषय निवडला. आयआयएम बंगळुरूमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या परत आल्या आणि कुटुंबियांच्या अटीप्रमाणे त्यांना सर्वात अगोदर लग्न करावे लागले. लग्न केले पण त्यांना यादरम्यान आपली जिद्द नक्कीच सोडली नाही.
कुटुंबाला गरज असल्याने सर्वकाही सोडून कोलकता येथे सुरू केली नवी सुरूवात
प्राची यांनी अमेरिकेत जीई फायनान्शियल आणि एचएसबीसी सारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम केले. मात्र, सासू सासऱ्यांची तब्येत ठिक नसल्याने प्राची यांना पुन्हा एकदा कोलकता येथे सासरी परतावे लागले. सर्वकाही सोडून त्या कोलकता येथे आल्या. यादरम्यान कुटुंबाला त्यांची सर्वात जास्त गरज असल्याने त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला. कोलकता येथे येताच त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सिमेंटच्या व्यवसायात काम करण्याचा निर्णय घेतला.
ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर व्यवसायाला दिली नवी दिशा
प्राची यांनी फक्त कुटुंबाच्या व्यवसायात मदत केली नाही तर त्यांनी त्यांच्या आर्थिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून व्यवसायाला एक नवीन दिशा दिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांना एक महत्त्वाची कल्पना सुचली. विशेष म्हणजे त्यांची ही आयडिया यशस्वी ठरली. व्यवसायाचा विस्तार झाला आणि जगन्नाथ स्टोन्स नावाने चुनखडी क्रशिंगचे काम सुरू केले. प्राची यांच्याकडेच जगन्नाथ स्टोन्सच्या आर्थिक व्यवहारांची पूर्णपणे जबाबदारी आहे.
कुटुंबाला दिलेला वचन केले पूर्ण शिवाय स्वप्नही
प्राची यांना आयआयएममध्ये पाठवण्यात आले होते आणि त्यांना कुटुंबियांनी अगोदरच सांगितले होते की, शिक्षण पूर्ण होताच त्यांना लगेचच लग्न करावे लागले. कुटुंबियांना दिलेले वचन त्यांनी पाळले पण आपले स्वप्नही पूर्ण केले. प्राची या फक्त आता कुटुंबाचा व्यवसायच नाही सांभाळत तर सर्वांचे भविष्य चांगले करण्यात त्या दिवसरात्र काम करत आहेत.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहात? मग ही आहे महत्वाची गोष्ट
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्ही ही गुंतवणूक करू शकत नाहीत. गुंतवणूक नेहमीच नोंदणीकृत म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये करावी, ज्याची संपूर्ण माहिती सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. याबाबत सर्वात खास बाब म्हणजे तुम्हाला गुंतवणूकदाराशी काही समस्या असेल तर तुम्ही थेट गुंतवणूकदारासोबत एएमसीशी संपर्क करू शकता.
तक्रारीचे समाधानकारक निराकरण झाले नाही तर…
याव्यतिरिक्त SCORES पोर्टलद्वारे तक्रारी दाखल करता येतात. जर तक्रारीचे समाधानकारक निराकरण झाले नाही, तर गुंतवणूकदार स्मार्ट ODR पोर्टलचा वापर करू शकतात. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या आणि सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीची स्थापना 1999 मध्ये झाली आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून मंजुरी मिळाल्यानंतर 2000 मध्ये तिने कामकाज सुरू केले.