पूरात 10 कोटींची Rolls Royce फसली, 10 लाखांची टाटा कार सहज निघाली
Rolls Royce stuck in flood : सध्या सगळीकडं पावसाचं थैमान आहे. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं गावाला वेढा दिला आहे. तर सोशल मीडियावरील एका व्हिडिओत रोल्स रायस कार पूरात अडकल्याचे दिसले.

पश्चिम बंगालमधील कोलकत्ता शहरात मंगळवारी केवळ 7 तासांत 250 मिलीमीटर इतका पाऊस झाला. या राज्यासह राजधानीला पावसाने झोडपून काढले. महाराष्ट्रासारखी अतिवृष्टी या राज्यात झाली. कोलकत्तात वार्षिक सरासरी पावसाच्या 20 टक्के पाऊस एकाच दिवशी पडला. यामुळे या शहराच्या रस्ते जलमय झाले तर काही रस्त्यावर पूरस्थिती आली. या पूरात अनेक आलिशान कार फसल्या. बाईक बुडल्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अवघ्या काही तासांच्या पावसाने कोलकत्ता शहर पाण्यात बुडाले. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.
दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये जवळपास 10 कोटींची आलिशान Rolls-Royce Ghost (रोल्स-रॉयस घोस्ट)कार पाण्यात फसलेली दिसली. तर त्याच्या जवळून टाटाची एक 10 लाखांची कार सहज पाण्यातून मार्ग काढत जात होती. या कारमधील व्यक्तीने या रॉल्स रॉयसचा एक व्हिडिओ शूट करत आलिशान कारच्या मालकाला चिमटा घेतला.
समाज माध्यमांवर चर्चा
या व्हिडिओत टाटा कारचा चालक पूरस्थितीत आलिशान कारवर कमेंट करताना दिसतो. तो म्हणतो की आपली फॅमिली कार सहजपणे पाण्यातून मार्ग काढताना दिसते. तर कोट्यवधींची रोल्स-रॉयस पाण्यातच अडकलेली आहे. इन्स्टाग्रामवर अनेक युझर्सने त्यावर कमेंट केल्या आहेत. त्यांच्या मते या आलिशान कार या जलमय रस्त्यावर चालण्यासाठी नाहीच.
View this post on Instagram
संताप आणि सवाल
काही युझर्सनी कोलकत्ताच्या पाणी निचरा व्यवस्थापनावर सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी या ड्रेनेज व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. जेव्हा या कारचा मालक इतका कराचा भरणा करतो, तेव्हा त्याला चांगल्या दर्जाचा रस्ता आणि इतर नागरी सुविधा मिळणे क्रमप्राप्त असल्याचे मत अनेक युझर्सने मांडले. तर काही युझर्सने ड्रेनेज सिस्टिम चांगली असल्याचा दावा केला आहे. पण अचानक इतका पाऊस पडल्यावर त्या व्यवस्थेवर ताण येणे सहाजिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मोठे नुकसान आणि जीवितहानी
अधिकाऱ्यांनुसार, या 7 तासांच्या पावसाने मोठे नुकसान झाले आणि सखल भागात पाणी साचले. विविध दुर्घटनेत आतापर्यंत 12 लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यात 9 लोकांचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे, शॉक लागून झाला आहे. 1988 नंतर शहरातील ही अतिवृष्टी असल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे.
