AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance : दिवाळीत फटक्यांची नको भीती! 11 रुपयांत 25,000 रुपयांचे कव्हरेज; या UPI ॲपचा जबरदस्त विमा प्लान, झटपट खरेदी करता येणार

Firecracker Insurance Plan : दिवाळीत फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. अनेकजण प्रदूषण होते म्हणून फटाके वाजवत नाही. तर काही जण फटाके फोडतात. त्यांच्यासाठी आता एक खास विमा बाजारात आला आहे. अवघ्या 11 रुपयांत 25 हजारांचे विमा कवच मिळणार आहे.

Insurance : दिवाळीत फटक्यांची नको भीती! 11 रुपयांत 25,000 रुपयांचे कव्हरेज; या UPI ॲपचा जबरदस्त विमा प्लान, झटपट खरेदी करता येणार
जबरदस्त विमा
| Updated on: Sep 24, 2025 | 3:19 PM
Share

PhonePe Firecracker Insurance Plan : दिवाळीसाठी एक खास विमा प्लान समोर आला आहे. फोनपे कंपनीने हा विमा प्लान आणला आहे. या योजनेत, कुटुंबातील पती-पत्नी, कमीत कमी दोन मुलांना विमा संरक्षण मिळते. आता सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्री सुरू आहे. दसरा येईल. त्यानंतर दिवाळी येईल. यावेळी दिवाळी पाच दिवसांची असेल. 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या दरम्यान दिवाळी असेल. तर 20 ऑक्टोबर रोजी पूजन होईल. या काळात फटक्यामुळे इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मायक्रो इन्शुरन्सची मागणी वाढत आहे. PhonePe सारख्या डिजिटल कंपन्या त्यासाठी नवीन ऑफर घेऊन आल्या आहेत.

दिवाळीत मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येते. अनेक जण तर फटाक्यांची लड लावतात. अनार, भूईचक्री, कानठळ्या बसवणारे फटाके फोडल्या जातात. या आनंदाला कधी कधी गालबोट लागते. फटाक्यामुळे शरीराला मोठे नुकसान होते. अशावेळी मोठी इजा झाल्यास मोठा खर्च लागू शकतो. अशावेळी विम्याची गरज भासते. ऑनलाइन पेमेंट ॲप फोनपे (PhonePe) कंपनीने स्पेशल इन्शुरन्स आणला आहे.

11 रुपयांमध्ये 25 हजारांचे विमा संरक्षण

फोनपे कंपनीने या प्लानचे नाव फायरक्रॅकर्स इन्शुरन्स (PhonePe’s Firecracker Insurance) असं आहे. हा विमा अवघ्या 11 रुपयांत ऑनलाईन खरेदी करता येतो. फटक्यामुळे अपघात झाल्यास 25 हजार रुपयांचा विमा संरक्षण देण्यात येते. हा प्लान गेल्यावर्षी सुद्धा कंपनीने आणला होता. त्यावेळी हा विमा 9 रुपयांत देण्यात येत होता. आता त्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा विमा 11 रुपयांमध्ये देण्यात येत आहे.

किती दिवसांसाठी हा विमा?

12 ऑक्टोबर रोजीपूर्वी पॉलिसी खरेदी करणाऱ्यांना त्याच दिवशीपासून विमा संरक्षण सुरू होईल. हा विमा फेस्टिव्ह सीजनपर्यंत सुरू असेल. त्यानंतर खरेदी करण्यात आलेला विमा 11 दिवसांसाठी सुरु असेल. याचा अर्थ 11 रुपयांच्या या खास विमा प्लानमध्ये विमाधारकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जवळपास 11 दिवसांसाठी 25 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.

  • या पॉलिसीत फटक्यामुळे इजा झाल्यास उपचारासाठी मदत मिळेल.
  • अशा अपघातात 24 तासांपेक्षा अधिक काळ उपचारासाठी भरती व्हावे लागले तर त्याचा खर्च कंपनी करेल.
  • डे-केयर ट्रीटमेंट म्हणजे 24 तासांपर्यंतच्या उपचाराचा खर्च करण्यात येईल.
  • जर फटाका अपघातात मृत्यू झाला तर वारसदाराला विमातंर्गत भरपाई देण्यात येईल.

अशी करा खरेदी ?

  1. विमा योजना खरेदी करायची असेल तर सर्वात अगोदर PhonePe ॲपवर जा
  2. त्यानंतर Insurance सेक्शनवर जा
  3. Firecracker Insurance वर क्लिक करा
  4. कुटुंब आणि तुमची माहिती नोंदवा
  5. आता कागदपत्रं अपलोड करा आणि 11 रुपये पेमेंट करा
  6. थोड्याच वेळात तुमच्या नावे पॉलिसी सक्रिय होईल
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.