Reliance सोडून अंबानींची या कंपनीत मोठी गुंतवणूक; काय आहे मुकेश-नीता यांचा प्लॅन

Nita Mukesh Ambani : एक मोठी अपडेट समोर येत आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांनी रिलायन्स कंपनी सोडून या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. अंबानी कुटुंबाचा काय आहे प्लॅन? काय आहे आर्थिक क्षेत्रातील ही अपडेट?

Reliance सोडून अंबानींची या कंपनीत मोठी गुंतवणूक; काय आहे मुकेश-नीता यांचा प्लॅन
नीता, मुकेश अंबानी, रिलायन्स, जिओ
| Updated on: Jul 31, 2025 | 3:40 PM

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडला बुस्टिंग करण्यासाठी अंबानी कुटुंब मैदानात उतरले आहे. त्यासाठी त्यांनी रिलायन्सन (RIL)सोडून या कंपनीत गुंतवणुकीचा एकदम ढासू योजना केली आहे. जिओ फायनेन्शिअलमध्ये अंबानी कुटुंब 10,000 कोटी रुपयांची जबरदस्त गुंतवणूक करत आहे. आर्थिक क्षेत्रात जिओ फायनेन्शिअलला नवीन उंचीवर पोहचवण्यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांनी खास योजना आखली आहे.

RIL नाही जिओ और जिने दो

तर अंबानी कुटुंबाने आता RIL ऐवजी जिओ फायनेन्शिअल कंपनीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिओ आता रिलायन्सपेक्षा वेगळी आर्थिक फर्म म्हणून काम करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी आहे. ही कंपनी ऊर्जा, टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात काम करत आहे.

कोणाकडे किती शेअर?

मार्च 2024 पर्यंत अंबानी कुटुंबाकडे RIL चे 50.39% शेअर आहेत. हे शेअर देवर्षी कमर्शियल्स LLP आणि तत्त्वम एंटरप्राइजेज LLP सारख्या होल्डिंग कंपन्यांकडून नियंत्रित करण्यात आले आहे. दुसरीकडे जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज एक नॉन-बॅकिंग फायनेन्शिअल कंपनी (NBFC) आहे. ही कंपनी ऑगस्ट 2023 मध्ये रिलायन्सपासून स्वतंत्र करण्यात आली होती. ती शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली. शेअरधारकांना त्यावेळी 1:1 प्रमाणात शेअर मिळाले होते. अंबानी कुटुंबाकडे जिओ फायनेन्शिअलचे
47.12% शेअर आहेत.

जागतिक ब्लॅकरॉक सोबत करार

बिझनेस स्टँडर्डच्या एका अहवालानुसार, जिओ फायनेन्शिअलला बाजारात मजबूत स्थितीत आणण्यासाठी अंबानी कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे. अंबानी कुटुंबाचे ग्लोबल नेटवर्क त्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. जिओ फायनेन्शिअलने काही दिवसांपूर्वी ब्लॅकरॉकसोबत मिळून 17,500 कोटींचा पहिला फंड लाँच केला आहे. याशिवाय जर्मनीच्या एलियांज ग्रुप सोबत 50:50 प्रमाणात विमा क्षेत्रात संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. जिओ फायनेन्शिअल डिजिटल कर्ज, विमा आणि अर्थ नियोजनातील मोठी कंपनी असावी यासाठी अंबानी कुटुंब प्रयत्न करत आहे. त्यासाठीच जिओ फायनेन्शिअलमध्ये अंबानी कुटुंब 10,000 कोटी रुपयांची जबरदस्त गुंतवणूक करत आहे.  लवकरच या कंपनीचा भारतीय बाजारात मोठा शेअर दिसून येण्याची शक्यता आहे.