कमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक

एलआयसीच्या अशा 5 योजना ज्यामध्ये गुंतवणूर करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळू शकता. म्हणजेच जर तुम्हाला यामध्ये परताव्यासह जीवन विमा आणि अपघात विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एलआयसीची ही पॉलिसी खरेदी करू शकता.

कमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक
jeevan shanti scheme
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 8:55 AM

मुंबई : एलआयसीच्या अनेक पॉलिसी बाजारात उपलब्ध आहेत पण यामध्ये कोणती चांगली आहे. याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एलआयसीच्या अशा 5 योजना ज्यामध्ये गुंतवणूर करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळू शकता. म्हणजेच जर तुम्हाला यामध्ये परताव्यासह जीवन विमा आणि अपघात विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एलआयसीची ही पॉलिसी खरेदी करू शकता. (lic best policy for best return and life cover jeevan labh jeevan anand and jeevan shanti yojna)

सध्या बाजारात एलआयसीच्या तब्बल 30 योजना आहेत. पण यात चांगलं काय आहे आणि त्यात गुंतवणूक करणं योग्य आहे की नाही हे लोकांना माहिती नाही. जवळपास एलआयसीच्या सर्व योजना खास असतात. पण त्यांच्यात काही खास योजनादेखील असतात. जाणून घेऊयात याबद्दल

कन्यादान पॉलिसी

दाम्पत्याला भविष्यात मुलीच्या लग्नाची चिंता नसावी म्हणून ही पॉलिसी तयार केली आहे. कन्यादान पॉलिसीमध्ये आई आणि वडिलांना बचत करण्याची चांगली संधी मिळते. या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम सोबतच ठेवीच्या सुरक्षेचीही हमी दिली जाते. रोज 125 रुपये जमा केल्यानंतर विमाधारकांना भविष्यात 27 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावे लागतील. त्यानंतनर पुढचे तीन वर्षे कुठलेही प्रिमियम भरण्याची गरज नाही. तसेच विमाधरकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला कोणताही प्रिमियम भरण्याची गरज नाही.

काय आहेत अटी ? – या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वय कमीतकमी 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे. मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत. 3 वर्षे प्रिमियम भरल्यानंतर विमाधारकाला या पॉलिसीवर कर्ज घेता येईल.

जीवन लाभ पॉलिसी

एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला दरवर्षी 1 लाख रुपये जमा करावे लागतात, जे तुम्ही दरमहा आधारावर देखील जमा करू शकता. हे पैसे 10 वर्षांसाठी जमा करावे लागतील आणि 10 वर्षात तुम्ही कंपनीला 10 लाख रुपये द्याल. यानंतर, कंपनी पुढच्या 6 वर्षांसाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करतील. म्हणजेच, तुम्हाला फक्त 10 वर्षे पैसे जमा करावे लागतील आणि 6 वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.

यानंतर, पॉलिसी सुरू केल्याच्या 16 वर्षानंतर तुम्हाला पैसे परत मिळतील. अशा परिस्थितीत जर तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये जमा केले तर 16 वर्षानंतर तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील. यामध्ये कंपनीच्या वतीने जोखीम संरक्षण देखील दिले जाते.

जीवन आनंद पॉलिसी

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 26 वर्ष असली पाहिजे. या योजनेमध्ये 25 वर्षांच्या कालावधीत परतावा मिळतो. ही पॉलिसी बोनस सुविधा, तरलता आणि गुंतवणूकीच्या बाबतीत सर्वोत्तम मानली जाते. या पॉलिसीनुसार संबंधित व्यक्तीला किमान 1 लाख रुपये मिळण्याची हमी आहे. तर कमाल रक्कमेसाठी कोणतीही मर्याद नाही. याशिवाय गुंतवणूकदारांना रिस्क कव्हरदेखील मिळतो.

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक आणि विमा असे दोन्ही फायदे मिळतात. जीवन आनंद पॉलिसीसाठी 15 ते 35 वर्ष मुदत ठरवण्यात आली आहे. इतकंच नाही तर ही पॉलिसी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइनही उघडू शकता. या पॉलिसीसाठी वार्षिक, 6 महिने, तिमाही आणि मासिक आधारावर प्रीमियम भरता येतो. पॉलिसी खरेदीच्या 3 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या पॉलिसीवर कर्जही घेऊ शकता.

जीवन शांती पॉलिसी

या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे यात आपणास संरक्षण आणि बचत मिळते. सेवानिवृत्तीनंतर आपल्याला 74,300 रुपये वार्षिक पेन्शन आयुष्यभर मिळत राहते. या पॉलिसीचे संपूर्ण तपशील काय आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. एलआयसीची ही योजना खूप लोकप्रिय आहे, म्हणून आधीची पॉलिसी बंद झाल्यानंतर ती पुन्हा ती नव्यानं सुरू करण्यात आलीय. नवीन जीवन शांतीच्या नावाने आता ही पॉलिसी ओळखली जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकल प्रीमियम वार्षिक योजना आहे.

या योजनेत एकदाच मोठ्या रकमेची गुंतवणूक करता येते. यानंतर एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये निश्चित कालावधीसाठी आपल्याला आजीवन पैसे मिळणार आहेत. आपण हा फायदा मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक मिळवू शकता. या रकमेला एन्युइटी म्हणतात. एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजनेतून वार्षिक गुंतवणूक करता येते. संयुक्त जीवन आणि शेवटच्या एन्युइटी धारकाच्या मृत्यूनंतर खरेदी किंमत परताव्यासाठी त्वरित एन्युइटीमध्ये कोणत्याही एन्युइटीधारकाचे अस्तित्व टिकून राहण्यापर्यंत 100% आहे.

जीवन उमंग पॉलिसी

एलआयसीची ही योजना वयाच्या 100 वर्षांपर्यंत कव्हर करते. या पॉलिसीच्या मॅच्युअरिटीची रक्कम 100 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळेल. जर पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याने भरलेला सर्व प्रीमियम नामित व्यक्तीला परत केला जाईल. LIC जीवन उमंग योजना असं या खास योजनेचं नाव आहे. यामध्ये प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या 8 टक्के रक्कम आयुष्यासाठी किंवा 100 वर्षे वयापर्यंत दिली जाते.

जर एखाद्या व्यक्तीने वयाची 100 वर्षे पूर्ण केली तर कंपनी एकरकमी रक्कम विमाधारकास देईल. इतकंच नाहीतर वयाच्या 100 व्या वर्षी पॉलिसीधारकास सम अ‍ॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनस दिला जाईल. (lic best policy for best return and life cover jeevan labh jeevan anand and jeevan shanti yojna)

संबंधित बातम्या – 

फक्त 1 रुपये खर्च करून मिळणार 2 लाखांचा फायदा, Bank of Baroda ची धमाकेदार योजना

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल आज स्वस्त की महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

HDFC Bank महिला उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यास करणार मदत; स्मार्टअप उन्नती प्रोग्राम लाँच

(lic best policy for best return and life cover jeevan labh jeevan anand and jeevan shanti yojna)

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.