AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 1 रुपये खर्च करून मिळणार 2 लाखांचा फायदा, Bank of Baroda ची धमाकेदार योजना

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात.

फक्त 1 रुपये खर्च करून मिळणार 2 लाखांचा फायदा, Bank of Baroda ची धमाकेदार योजना
Bank-of-Baroda
| Edited By: | Updated on: Mar 09, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक Bank of Baroda ग्राहकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत (पीएमजेजेबीवाय) दररोज दोन लाख रुपयांचा विमा देत आहे. ही एक मुदत विमा योजना आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. देशातील प्रत्येक व्यक्तीला आयुर्विम्याचा लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 9 मे 2015 रोजी पीएमजेजेबीवाय सुरू केली. (bank of baroda pradhan mantri jeevan jyoti bima yojana pmjjby here is all details)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काय आहे?

बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आहेत. ही भविष्यकाळातील सुरक्षित योजना असून पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे घेतली जाते. या योजनेच्या रकमेसाठी बँका प्रशासकीय फी आकारतात. याशिवाय या रकमेवर जीएसटीही लागू आहे.

कोण घेऊ शकेल पॉलिसी ?

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मुदत योजना घेण्याचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे आहे. या पॉलिसीचे मॅच्युरिटी वय 55 वर्षे आहे. पीएमजेजेबीवाय पॉलिसी कोणत्याही तारखेला खरेदी केली जाते, पहिल्या वर्षाचे कव्हरेज पुढील वर्षी 31 मेपर्यंत असेल. नंतरच्या वर्षांत, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे कव्हर दरवर्षी 1 जूनला बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम भरून काढता येईल.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आहे खास

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) मे 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही एक मुदत विमा योजना आहे, जी देशातील गरीब लोकांच्या लक्षात ठेवून तयार केली गेली. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची वैधता एक वर्ष आहे आणि तिचं दरवर्षी नूतनीकरण करण्यात येते.

विम्याचा कालावधीः 1 जून ते 31 मे

वार्षिक प्रीमियम ऑटो डेबिट सुविधेद्वारे बँक खात्यातून वजा केले जाते. या चालू असलेल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी 31 मे 2021 पर्यंत त्यांच्या खात्यात पुरेसा शिल्लक ठेवला पाहिजे, जेणेकरून या योजनांचा लाभ कायम राहील. (bank of baroda pradhan mantri jeevan jyoti bima yojana pmjjby here is all details)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल आज स्वस्त की महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

HDFC Bank महिला उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यास करणार मदत; स्मार्टअप उन्नती प्रोग्राम लाँच

महिलांसाठी केंद्रातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘या’ तीन विशेष योजना; थेट 10 लाखांची कमाई

(bank of baroda pradhan mantri jeevan jyoti bima yojana pmjjby here is all details)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.