LIC Jeevan Umang Policy : दर महिना 1302 रुपयांची गुंतवणूक करा, 28 लाख रुपयांपर्यंत रिटर्न मिळवा!

| Updated on: Apr 02, 2021 | 11:53 AM

अनेक जण बचत म्हणून नेहमीच एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. (LIC Jeevan Umang Insurance Policy)

LIC Jeevan Umang Policy : दर महिना 1302 रुपयांची गुंतवणूक करा, 28 लाख रुपयांपर्यंत रिटर्न मिळवा!
एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास मूलं बनू शकतात लखपती
Follow us on

मुंबई : सुरक्षित भविष्यासाठी बचत करणे फार महत्त्वाचे आहे. अनेक जण बचत म्हणून नेहमीच एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हाला जोखीम नसलेल्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तर एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. (LIC Jeevan Umang Insurance Policy)

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिना 1302 रुपयांची गुंतवणूक करुन 28 लाख रुपयांपर्यंत रिटर्न मिळवू शकता. विशेष म्हणजे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पैसे मिळतात. ही योजना नेमकी काय? याचा फायदा कसा होतो? आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी? याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

जीवन उमंग पॉलिसी काय?

एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी ही एक Endowment योजना आहे. यामध्ये लाईफ कव्हरबरोबरच तुम्हाला मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळते. या योजनेत 3 महिन्यांच्या लहान बाळापासून 55 वर्षांपर्यंतचे लोक गुंतवणूक करु शकतात. या योजनेअंतर्गत 100 वर्षांपर्यंत कव्हरेज मिळतं. तसेच पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला त्याची एकरकमी रक्कम मिळेल.

किती वर्षांसाठी गुंतवणूक

या पॉलिसीअंतर्गत गुंतवणूकदारांना 15, 20, 25 किंवा 30 वर्षे गुंतवणूक करू शकतात. यामध्ये प्रतिवर्षी विम्याच्या 8 टक्के दराने परतावा दिला जातो. तसेच पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास त्यालाही फायदा मिळणार आहे. तसेच भरलेल्या प्रीमियमवर 80 सी अंतर्गत इनकम टॅक्समध्ये सूट मिळेल.

किती रुपयांची गुंतवणूक 

एलआयसीच्या या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला दर महिना 1302 रुपयांची गुतंवणूक करावी लागेल. त्यानुसार तुमची वर्षाची गुंतवणूक ही 15 हजार 298 रुपये इतकी होईल. म्हणजेच जर तुम्ही ही पॉलिसी 30 वर्षांसाठी घेतला तर तुमच्या गुंतवणुकीची रक्कम ही 4,58,940 इतकी होईल. यानंतर 31 व्या वर्षापासून तुम्हाला दर वर्षाला 40 हजार रुपयांचा परतावा मिळेल. जर तुम्ही वयाच्या 100 वर्षापर्यंत ही योजना घेतला तर ही रक्कम 28 लाख रुपये होईल. (LIC Jeevan Umang Insurance Policy)

संबंधित बातम्या : 

RBI चे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किट बनवणाऱ्या कंपनीची जबाबदारी सांभाळणार

GST Collection मध्ये बंपर उसळी, मार्चमध्ये जीएसटीचा इतिहासातील सर्वाधिक कर वसूल

फक्त 5 हजारात सुरू करा बक्कळ कमाई देणारा व्यवसाय, पहिल्याच महिन्याला कमवाल 20000

Royal Enfield । रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ, या बाईकला आहे जास्त मागणी