PF अकाऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार

| Updated on: May 17, 2021 | 2:03 PM

ईपीएफओद्वारे अनेक खातेदारांना व्याजाच्या चांगल्या रक्कमेसह बरीच सुविधा मिळते. पण कधीकधी तुमच्या चुकांमुळे तुम्हाला काही त्रासही सहन करावा लागू शकतो. (Link PAN Card with EPF account)

PF अकाऊंटशी संबंधित हे काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार
तुमचा आधार ईपीएफ खात्याशी लिंक नाही, मग खात्यात जमा होणार नाहीत पैसे
Follow us on

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतंर्गत (EPFO Employees Provident Fund Organisation) कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात. ईपीएफओद्वारे अनेक खातेदारांना व्याजाच्या चांगल्या रक्कमेसह बरीच सुविधा मिळते. पण कधीकधी तुमच्या चुकांमुळे तुम्हाला काही त्रासही सहन करावा लागू शकतो. कारण जर तुम्ही ईपीएफओच्या नियमांनुसार काम केले नाही तर तुमचे पैसेही कापले जाऊ शकतात. अनेक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना यापूर्वी या अडचणींचा सामना करावा लागला आहे. (Link PAN Card with EPF account helps you to save taxes)

मग अशावेळी असे कोणते काम आहे जे तुम्ही केले नाही, तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो किंवा तुमचे नुकसान होऊ शकते. प्रत्येक पीएफ खातेधारकाने या कामाकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. जर तुम्ही ते पूर्ण केले तर भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही. ते काम नेमके काय, तो विशिष्ट नियम कोणता? जाणून घ्या त्याबद्दल सर्व काही….

नियम काय?

ईपीएफओने काही दिवसांपूर्वी एक अलर्ट जारी केला होता. त्यात त्यांनी अकाऊंट धारकांना पॅन कार्ड पीएफ खात्याशी जोडावे, अशी सूचना केली होती. जर पीएफ खातेधारकाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते, असेही ईपीएफओने सांगितले होते.

त्यामुळे जर तुमचे पीएफ खाते असेल तर तुमचे पॅनकार्ड ईपीएफओशी लवकरात लवकर लिंक करा. यासाठी ईपीएफओने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक संदेशही जारी केला होता. त्यात त्यांनी पॅनकार्ड ईपीएफओशी लिंक करणे गरजेचे आहे असे म्हटले होते.

पॅनकार्ड लिंक नसेल तर काय?

जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड यूएएनशी लिंक केले नाही तर तुम्हाला पीएफचे पैसे काढताना आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जे लोक पॅन कार्ड लिंक करत नाहीत आणि पीएफ काढण्यासाठी अर्ज करतात त्यांचा जास्तीत जास्त टीडीएस (TDS) कापला जातो. त्या उलट जे खातेधारक पॅनकार्ड लिंक करता त्यांना दिलासा मिळतो.

दरम्यान जर तुमचे पीएफ खाते पाच वर्षांपेक्षा जुने असल्यास आणि खात्यात जमा केलेली रक्कम 50 हजारांपेक्षा जास्त असल्यात पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर वजा केला जातो. (Link PAN Card with EPF account helps you to save taxes)

संबंधित बातम्या : 

निष्क्रिय बँक खात्यावरही व्याज उपलब्ध, पैशांची गरज असल्यास पुन्हा सक्रिय करु शकता खाते

कॅनरा बँकेचा ग्राहकांना ॲलर्ट, ATM वरील ‘ही’ सेवा तात्काळ बंद करा, अन्यथा खात्यातील पैसे गायब होण्याचा धोका

कोरोना संकटातही ‘या’ क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा पगार दुप्पट वाढला, जाणून घ्या किती फायदा?