Pan Card : आता लाड नाही, प्राप्तिकर खात्याची थेट अॅक्शन..तुमचं पॅन कार्ड होईल रद्द

| Updated on: Nov 19, 2022 | 9:22 PM

Pan Card : प्राप्तिकर खात्याने अनेक संधी दिल्यानंतरही तुम्ही हे काम केले नसेल तर त्याचा फटाका तुम्हाला बसू शकतो..

Pan Card : आता लाड नाही, प्राप्तिकर खात्याची थेट अॅक्शन..तुमचं पॅन कार्ड होईल रद्द
..तर पॅन कार्ड रद्द
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : प्राप्तिकर खात्याने (Income Tax Department) अनेक संधी दिल्यानंतरही तुम्ही हे काम केले नसेल तर त्याचा फटाका तुम्हाला बसू शकतो. तुमचं पॅनकार्ड (Pan Card) ही रद्द होऊ शकतं. अर्थात त्यासाठी करदात्यांना (Tax Payer) आणि सर्वच नागरिकांना पुरेसा वेळ देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यासंबंधीची माहिती आयकर विभाग देत आहे.

पॅनकार्ड हे भारतीय नागरिकांच्या आर्थिक घाडमोडींची जंत्रीच आहे. तर आधारकार्ड (Aadhaar Card) हा एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. हे दोन्ही कार्ड परस्परांशी लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे.

हे सुद्धा वाचा

आयकर विवरण पत्र भरण्यासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी केंद्र सरकारने आधार कार्डशी पॅनकार्डची जोडणी (Aadhar-Pan Card Linking) करणे आवश्यक केले आहे.

केंद्र सरकारने या जोडणीसाठी आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ ही दिली आहे. आता मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आताची मुदतवाढ ही सशुल्क आहे. त्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे. कारण यापू्र्वी आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती.

पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत (Last Date) पुढे ढकलण्यात आली होती. 31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता.

तर 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. ही मुदत ही 31 मार्च 2022 रोजी पर्यंत आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील.

यासंबंधी आयकर विभागाने एक ट्विट केले आहे. त्यात 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड-आधार कार्डशी न जोडल्यास नागरिकांचे पॅनकार्ड रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


आसाम, जम्मू आणि काश्मीर तसेच मेघालयाचे रहिवासी, अनिवासी भारतीय आणि 80 वर्षे वयावरील व्यक्ती यांना या लिंकिंग मधून सूट देण्यात आलेली आहे.

आयकर विभागाच्या ई-फायलिंग या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जावे लागेल. लिंकिंगचा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करावी लागेल. या लिंकिंगसाठीचे विलंब शुल्क (1000रुपये) NSDL च्या संकेतस्थळावर जाऊन भरावे लागेल.

विलंब शुल्क भरल्यावर आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर पुढील प्रक्रिया करता येईल. विलंब शुल्क भरल्याची नोंद त्याठिकाणी रिफ्लेक्ट होण्यास काही कालावधी लागेल. नागरिकांना किमान चार दिवस थांबावे लागेल.

आधार आणि पॅनकार्डावरील तुमचे व्यक्तिगत नाव, जन्मतारीख, पत्ता मोबाईल क्रमांक आदी तपशील द्यावे लागतील. हे तपशील परस्परांशी जुळत नसले, तर हे लिंकिंग होणार नाही.

आधार आणि पॅन कार्ड परस्परांशी लिंक झाले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आयकर विभागाच्या एसएमएस सुविधेचा वापर करता येईल. UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number> त्यासाठी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.