कर्ज घेण्यासाठी ITR आवश्यक आहे का? जाणून घ्या

अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की कर्ज घ्यायचे असेल तर ITR आवश्यत आहे. पण, हे खरंच सत्य आहे का, याविषयी पुढे वाचा.

कर्ज घेण्यासाठी ITR आवश्यक आहे का? जाणून घ्या
ITR
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Aug 26, 2025 | 1:31 AM

कर्ज घ्यायचे म्हणजे ITR भरलेले हवे, असं बोललं जातं. कर्ज घेण्यासाठी ITR आवश्यक आहे, त्याशिवाय कर्ज मिळत नाही, असं देखील अनेकदा ऐकण्यात येतं. पण, हे खरं आहे का? किंवा कर्ज घेण्यासाठी ITR का मागितला जातो. याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

तुम्ही वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न भरले तर बँक तुम्हाला सहज कर्ज देते. पण आयकर विवरणपत्र (ITR) न भरणाऱ्यांना बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि प्रक्रिया काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे, स्वस्त व्याजावर सुलभ कर्ज मिळविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आयकर विवरणपत्र (ITR) भरणे. आयटीआरच्या (ITR) मदतीने करदात्याच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन बँकांकडून केले जाते. एखाद्या व्यक्तीची कर्ज फेडण्याची क्षमता किती आहे, हे तपासले जाते.

लोकांसाठी अनेक पर्याय आहेत

ITR भरल्यास बरे अन्यथा गृहिणी, पहिल्यांदा कमावणारी किंवा फ्रीलान्सर सारखी इतर कोणतीही व्यक्ती आयकर विवरणपत्र भरत नाही. अशा लोकांना कर्ज मिळणे थोडे अवघड असू शकते, परंतु कर्ज मिळवण्यासाठी त्यांच्याकडे काही पर्यायी मार्ग देखील आहेत.

1. ITR शिवाय बँक कर्ज

इन्कम टॅक्स रिटर्न भरले नाही तर तुमचे बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप, युटिलिटी बिल, रेंट पावती आदी पर्याय तयार ठेवावेत. याशिवाय जे लोक स्वयंरोजगार करत आहेत, त्यांच्यासाठी उलाढालीची नोंद, जीएसटी प्रमाणपत्र किंवा चलन आवश्यक असेल.

2. चांगले क्रेडिट स्कोर

इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसले तरी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक तुम्हाला सहज कर्ज देईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करत असाल तर स्थिर उत्पन्नाचा पुरावा आणि चांगला क्रेडिट स्कोअर असणं गरजेचं आहे.

3. दुसऱ्या कोणाकडून कर्ज घेणे?

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकत नसाल तर ITR भरणाऱ्या लोकांच्या सहकार्याने तुम्ही कर्ज घेऊ शकता. अशा वेळी दोघांची परतफेड करण्याची क्षमता बँकांकडून पाहिली जाणार आहे.

4. स्पेशल प्लॅनचे फायदे

स्वयंरोजगार किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज योजना कशा काढल्या जातात? जर तुम्हीही इन्कम टॅक्स रिटर्न भरले नाही तर तुम्ही इतर योजनांचा लाभ घेऊ शकता.

5. ‘हे’ आहेत सर्वात सुरक्षित पर्याय

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) न भरल्यामुळे जर तुम्हाला बँकांकडून कर्ज दिले जात नसेल तर तुम्ही गोल्ड लोनचा पर्याय निवडू शकता. छोट्या रकमेसाठी ITR ची गरज भासणार नाही. केवळ KYC आणि काही आवश्यक कागदपत्रे काम करतील.