LPG Price : पहिल्याच तारखेला दणका; सणासुदीत एलपीजी सिलेंडर महागला, आता काय आहेत किंमती?

LPG Price Hike 1st October : पहिल्याच तारखेला तेल विपणन कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला. सलग ऑगस्टपासून दरवाढ सुरू आहे. सणासुदीत गॅस सिलेंडरचा भाव वधारल्याने त्यांना झटका बसला आहे. दिल्ली ते चेन्नई आणि मुंबई ते कोलकत्ता अशी वाढ झाली आहे.

LPG Price : पहिल्याच तारखेला दणका; सणासुदीत एलपीजी सिलेंडर महागला, आता काय आहेत किंमती?
एलपीजी सिलेंडरच्या किंमती भडकल्या
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 9:48 AM

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिशावर महागाईने आक्रमण केले. 1 ऑक्टोबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका बसला. ऑगस्ट महिन्यापासून सलग ऑक्टोबरपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ही वाढ झाली आहे. तर 14 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये कुठलाही बदल झाला नाही. सणासुदीत गॅस सिलेंडरचा भाव वधारल्याने त्यांना झटका बसला आहे. दिल्ली ते चेन्नई आणि मुंबई ते कोलकत्ता अशी वाढ झाली आहे.

दिल्ली-मुंबईसह या शहरात वधारले भाव

IOCL च्या संकेतस्थळानुसार, 19 किलोच्या गॅस सिलेंडरची नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. राजधानी दिल्लीसह इतर महागनगरातील किंमतीत वाढ झाली आहे. सणासुदीत आता हॉटेलिंग आणि दिवाळीचा फराळ महागणार आहे. बाहेरून फराळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसेल. सर्वच किंमती वधारलेल्या असताना गॅस दरवाढीमुळे फराळ महाग मिळेल. मुंबईत 19 किलोचा गॅसची किंमत सप्टेंबर महिन्यात 1605 रुपयांनी वाढवून 1644 रुपयांवर पोहचली. त्यात आता पु्न्हा एकदा वाढ झाली. आता देशाच्या आर्थिक राजधानीत आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1692.50 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय कोलकत्ता शहरात सप्टेंबर महिन्यात गॅस सिलेंडरची किंमती 1802.50 रुपये होते. आता ही किंमत 1850.50 रुपये आहे. चेन्नई शहरात सिलेंडरची किंमत 1903 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 1855 रुपये होती. दिल्लीत या किंमती 1740 रुपयांवर पोहचल्या आहेत .

इतकी केली कपात

सरकारने होळीच्या वेळी नागरिकांना दिलासा दिला. 100 रुपयांची कपात केली होती. तर त्यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 200 रुपयांनी गॅस स्वस्त झाला होता. एका वर्षात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 300 रुपयांची कपात केली आहे. तर आता किंमतीत वाढ झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा भाव स्थिर

19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात सतत बदल दिसला. तर दुसरीकडे तेल कंपन्यांनी अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात कोणताच बदल केलेला दिसला नाही. महिला दिवशी मोदी सरकारने ग्राहकांना दिलासा दिला होता. 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. सध्या दिल्लीत एका सिलेंडरची किंमत 803 रुपये, कोलकत्तामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 818.50 रुपये इतका आहे.

टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.