घरातलं जेवण दुप्पट महागलं! 2012 च्या तुलनेत 2022 मध्ये जवळपास सगळ्या वस्तूंचे दर डबल

2014 मध्ये 100 रुपयांना असलेली वस्तू आता 170 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

घरातलं जेवण दुप्पट महागलं! 2012 च्या तुलनेत 2022 मध्ये जवळपास सगळ्या वस्तूंचे दर डबल
महागाई वाढली...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:35 AM

मुंबई : महागाईनं सगळ्यांचं जगणं मुश्किल केलंय. पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दर गेल्या महिन्याभरापासून स्थिर असले, तरी वाढलेली महागाईही स्थिरच आहेत. इतर वस्तूंच्या दरांमध्ये कोणतीही घट झाल्याची नोंद नाही. अशातच महागाईचा (Inflation) राक्षस गेल्या दहा वर्षात कमालीचा क्रूर झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. दहा वर्षात घरातील जेवणं दुप्पट मगादलंय. समोर आलेल्या सरकारी आकडेवारीसून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महागाईनं गेल्या आठ वर्षातला विक्रम मोडल्याचं नुकतंच समोर आललं. महागाई 7.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. महागाईनं आरबीआयच्या (RBI) मर्यादा मोडल्यानं सगळ्यांचंच बजेट कोलमडलंय. 2012 ते 2022 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये घरातील किराणा सामानापासून अनेक वस्तूंचे दर हे सध्याच्या घडीला दुप्पट आहेत. घरातील सिलिंडर गॅसपासून स्वयंपाकाच्या वस्तूंचा किराणाही महागलेलाय.

महागाईचा भडका…

  1. 2022 साली दोन डझन केळीचा दर 66 रुपये होता. आता हाच दर 2022 साली 98 रुपयांवर गेलाय.
  2. 1 डझन अंडी 2012 साली 40 रुपयांना मिळत होती, आता 2022 मध्ये एक डझन अंड्याचा दर 72 रुपये इतका आहे.
  3. 5 किलो कांद्याचा दर 60 रुपये असून 2022 मध्ये हाच दर 110 रुपयांवर पोहोचलाय.
  4. 2012 साली पाव किलो चहा पावडर 80 रुपयांना मिळत होता. 2022 मध्ये पाव किलो पावडरसाठी 118 रुपये मोजावे लागतात.
  5. हे सुद्धा वाचा
  6. अर्धा किलो मिठासाठीची किंमत 7 रुपयांवरुन 12 रुपये इतकी रक्कम मोजावी लागतेय.
  7. 10 किलो गहू 2012 साली 180 रुपयांचा मिळत होते. 2022 मध्ये 10 किलो गव्हाची किंमत आता 256 रुपये इतकी झालीय.

महागाईचा चढता आलेख

2021च्या तुलनेमध्ये 2022 मध्ये अन्नधान्य 7.68 टक्क्यांनी महागलं आहे. नोव्हेंबर 2020 नंतर नोंदवण्यात आलेली ही सर्वाधिक वाढ आहे. तर 2014 ते 2022 दरम्यान, मध्यमवर्गीयांच्या महिन्याच्या बजेटमध्ये 4.47 टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. याचा अर्ध 2014 मध्ये 100 रुपयांना असलेली वस्तू आता 170 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

WPIच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये किराणा सामानाची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 68 टक्क्यांनी वाढली आहे. 2012च्या तुलनेत 2022 मध्ये किराणा मालाचं बिल दुप्पट धालंय.. घरगुती सामान 843 रुपयांत सरासरी येत होतं. आता मात्र याच सामानासाठी 1654 रुपये इतकी रक्कम सामान्यांना मोजावी लागते आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.