मोठी बातमी: मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ

| Updated on: Oct 14, 2021 | 12:38 PM

CNG | सीएनजीच्या या वाढलेल्या दरामुळे मुंबईतील लाखो ऑटो आणि टॅक्सी चालकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. घरगुती पाइपलाइन गॅसच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडणार आहे.

मोठी बातमी: मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ
सीएनजी
Follow us on

मुंबई: दिल्लीपाठोपाठ आता मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती अनुक्रमे 2.97 आणि 1.29 रुपये प्रति किलो वाढवल्या आहेत. 13 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने मंगळवारी सीएनजीच्या किंमतीत 2.28 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीची किंमत 57.54 रुपये प्रतिकिलो इतकी झाली. तर PNGचा भाव 33.93/SCM इतका झाला.

नऊ वर्षातील सर्वात उच्चांकी दर

दोन आठवड्यांपूर्वीच महानगर गॅसने सीएनजीच्या किमतीत 5.56 रुपये प्रति किलो (10.7%) आणि पीएनजीची किंमत 3.53 रुपये प्रति एससीएम (11.6%) ने वाढवली होती. सीएनजीच्या या वाढलेल्या दरामुळे मुंबईतील लाखो ऑटो आणि टॅक्सी चालकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. घरगुती पाइपलाइन गॅसच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडणार आहे.

तत्पूर्वी जुलै महिन्यात मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले होते.

सीएनजी दरात वाढ का?

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले. पूर्वीचा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका होता. 1 ऑक्टोबरपासून हे दर वाढवण्यात आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

काय परिणाम होणार?

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या:

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका