AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CNG Price Reduction: दिलासादायक बातमी! सीएनजीच्या दरात सहा रु. प्रति किलो तर पीएनजीच्या दरात चार रु. प्रति किलो कपात

दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. आता मात्र गॅसच्या दरात मात्र कपात झालीये.

CNG Price Reduction: दिलासादायक बातमी! सीएनजीच्या दरात सहा रु. प्रति किलो तर पीएनजीच्या दरात चार रु. प्रति किलो कपात
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Aug 17, 2022 | 9:20 AM
Share

मुंबई : सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडालेला आहे.जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. अश्यात आता मात्र एक दिलाश्याची बातमी. आता गॅसच्या दरात मात्र कपात झालीये. सीएनजी (CNG Price) आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आलीये. तर पीएनजीच्या (PNG Price) दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. तिकडे पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसंच यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या दरात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांना सीएनजी मुंबईमध्ये 80 रुपये प्रति किलो मिळणार आहे. पीएनजी 48. 50 रुपयांना मिळणार आहे. तर पुण्यात सीएनजी 87 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे.

सीएनजीच्या दरात घट

गॅसच्या दरात मात्र कपात झालीये. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आलीये. तर पीएनजीच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. तिकडे पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसंच यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दुधाच्या दरात वाढ

अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. नव्या वाढीव किंमती या आजपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार अधिक वाढला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू झालेत. अमूल दुधाच्या किमतीतील ही वाढ गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र व्यतिरिक्त दिल्ली आणि एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि अमूलची उत्पादने विकल्या जाणाऱ्या इतर सर्व ठिकाणी लागू असेल.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?