Steel : दोन महिन्यात स्टीलचे दर आले निम्म्यावर… बांधकाम काढणार्‍यांसाठी उत्तम संधी

मार्च 2022 मध्ये काही ठिकाणी स्टीलची किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती. सध्या हा आकडा 45 हजार रुपये प्रति टनापर्यंत खाली आला आहे.

Steel : दोन महिन्यात स्टीलचे दर आले निम्म्यावर... बांधकाम काढणार्‍यांसाठी उत्तम संधी
स्टीलचे दर आले निम्म्यावरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 1:17 PM

मुंबई :  पावसाळ्याच्या सिजनमध्ये अनेक लोक घरांचे बांधकाम काढत नाहीत. पावसाळी वातावरण असल्याने साहजिकच बांधकामावर पाणी मारण्याचा अतिरिक्त श्रम व पाणी वाचत असले तरी, पावसामुळे बांधकामात व्यत्यय येत असतो. त्यामुळे साहजिक बांधकाम कमी झाल्यास बांधकाम (Construction) साहित्यांना मागणीही कमी होते. गेल्या काही दिवंसापासून स्टील (Steel) म्हणजे बांधकामासाठी लागणार्या लोखंडी सळयांचे दर गगनाला भिडले होते. परंतु आता दोन महिन्यात स्टीलचे दर तब्बल निम्म्यावर आले असल्याने बांधकाम काढण्यासाठी ही उत्तम संधी मानली जात आहे. या वर्षी मार्चमध्ये स्टीलची किरकोळ किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती, जी आता 45-50 हजार रुपये प्रति टनावर आली आहे. गेल्या काही महिन्यांत केवळ स्थानिकच नाही तर ब्रँडेड स्टीलच्या किमतीतही (price) मोठी घट झाली आहे.

घराचे स्वप्न करा पूर्ण

घर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची योग्य वेळ असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सरकारचे प्रयत्न आणि काही हंगामी घटकांमुळे बांधकाम साहित्यांचे दर विक्रमी नीचांकी पातळीवर आले आहेत. आपण सर्वात महागड्या स्टीलच्या दरांबद्दल बोललो तर त्याची किंमत दररोज घसरत आहे. या वर्षी दोन महिन्यांपूर्वी स्टीलचे दर विक्रमी पातळीवर पोहचले होते. तेच दर दोन महिन्यांनंतर निम्मे खाली आले आहेत. याशिवाय सिमेंट ते विटांचे दरही घसरले आहेत.

हे सुद्धा वाचा

स्टीलचे दर आणतात जेरीस

कुठल्याही बांधकामासाठी सर्वाधिम महत्वाचा घटक हा स्टील असतो. घर किंवा इमारतीच्या मजबूतीसाठी तुम्ही कुठल्या प्रकार तसेच किती जाडीची स्टील वापरत आहात यावर तुमच्या बांधकामाची विश्‍वासार्हता ठरत असते. त्यामुळे बांधकामात स्टीलला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. घरांचा स्लॅब, पिलर आदी बनवण्यासाठी स्टीलचा मोठ्या संख्येने वापर केला जात असतो. पाया बांधतानाही स्टील मजबुती देत असते. त्यामुळे साहजिकच मागणी व पुरवठ्याच्या खेळामध्ये काही दिवसांपूर्वी स्टीलचे दर वाढल्याने बांधकाम करणारेही जेरीस आले होते. मार्चमध्ये काही ठिकाणी स्टीलची किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती. सध्या हा आकडा 45 हजार रुपये प्रति टनापर्यंत खाली आला आहे.

सरकारने निर्यात शुल्क वाढवला

सरकारने अलीकडेच स्टीलवरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात स्टील उत्पादनांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. हे देखील स्टीलच्या किमती कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. मार्च 2022 मध्ये, ब्रँडेड स्टीलचे दर प्रति टन 1 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचले होते.

स्टीलची सरासरी किरकोळ किंमत (प्रति टन):

  1. नोव्हेंबर 2021 : 70000
  2. डिसेंबर 2021 : 75000
  3. जानेवारी 2022 : 78000
  4. फेब्रुवारी 2022 : 82000
  5. मार्च 2022 : 83000
  6. एप्रिल 2022 : 78000
  7. मे 2022 (सुरुवात) : 71000
  8. मे 2022 (गेल्या आठवड्यात): 62-63000
  9. जून 2022 (सुरुवात): 48-50000

प्रमुख शहरांमधील भाव

  1. दुर्गापूर (पश्चिम बंगाल): 45,300
  2. कोलकाता (पश्चिम बंगाल): 45,800
  3. रायगड (छत्तीसगड) : 48,700
  4. राउरकेला (ओडिशा)  : 50,000
  5. नागपूर (महाराष्ट्र)   : 51,000
  6. हैदराबाद (तेलंगणा): 52,000
  7. जयपूर (राजस्थान): 52,200
  8. भावनगर (गुजरात): 52,700
  9. मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): 52,900
  10. गाझियाबाद (उत्तर प्रदेश): 53,000
  11. इंदूर (मध्य प्रदेश): 53,500
  12. गोवा: 53,800
  13. जालना (महाराष्ट्र): 54,000
  14. मंडी गोविंदगड (पंजाब): 54,300
  15. चेन्नई (तामिळनाडू): 55,000
  16. दिल्ली: 55,000
  17. मुंबई (महाराष्ट्र): 55,200
  18. कानपूर (उत्तर प्रदेश): 57,000
Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.