ओला-उबरला टक्कर, लवकरच मारुती-सुझीकीची अॅपवर आधारित कॅब?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : मुंबईसह देशातील इतर अनेक शहरात सध्या ओला-उबर टॅक्सीसेवा सुरु आहेत. यामध्ये आता मारुती-झुकीचाही समावेश होणार आहे. लवकरच मारुती-सुझुकी आणि सुझुकी मोटर अॅपवर आधारित टॅक्सीसेवा सुरु करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात ओला-उबरला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. कॅबसोबतच व्यावसायिक वाहनांसाठीही मारुती-सुझिकी अॅपवर आधारीत वाहनसेवा सुरु करणार आहे. ओला आणि उबरचं […]

ओला-उबरला टक्कर, लवकरच मारुती-सुझीकीची अॅपवर आधारित कॅब?
Follow us on

मुंबई : मुंबईसह देशातील इतर अनेक शहरात सध्या ओला-उबर टॅक्सीसेवा सुरु आहेत. यामध्ये आता मारुती-झुकीचाही समावेश होणार आहे. लवकरच मारुती-सुझुकी आणि सुझुकी मोटर अॅपवर आधारित टॅक्सीसेवा सुरु करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात ओला-उबरला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. कॅबसोबतच व्यावसायिक वाहनांसाठीही मारुती-सुझिकी अॅपवर आधारीत वाहनसेवा सुरु करणार आहे. ओला आणि उबरचं भारतात वाढलेलं प्रस्थ आणि मारुती-सुझुकीचं वाहतूक क्षेत्रातील दबदबा पाहता, येत्या काळात अॅपवर आधारित वाहनसेवा अधिक स्पर्धात्मक बनण्याची शक्यता आहे.

भारतातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

मारुती-सुझुकी आणि सुझुकी या दोन्ही कंपन्यांनी भारतात स्टार्टअपसाठी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. यामध्ये व्यावसायिक वाहनांसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जाणार आहे. मारुती कंपनीने यासाठी खास एक तंत्रज्ञान विभाग बनवला आहे. वाहनांचे मॉडेल आणि अॅप वर या विभागात काम केलं जाणार आहे.

सुझुकीने बंगळुरुमध्ये एक कार्यालय सुरु केलं आहे. या कार्यालयात कंपनीने आपल्या काही अमेरिकेमधील कर्मचाऱ्यांना बंगळुरुमध्ये बोलावून घेतलं आहे. या कर्मचाऱ्यांनाही स्टार्टअपच्या वेगवेगळ्या भागात काम करावे लागणार आहे.

मुंबई-पुणे किंवा दिल्ली-बंगळुरु यांसारख्या भारतातील मेट्रो शहरांमध्ये वाहतुकीबाबत वाढत जाणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता, सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याची आवश्यकता आहे. मात्र, सार्वजनिक वाहतुकीचे वाजलेले तीनतेरा पाहता, मधला मार्ग म्हणून अनेक राज्यांची सरकारे ओला, उबर यांसारख्या कॅब कंपन्यांना वाहतुकीसाठी परवानगी देत आहेत. मुंबई-पुण्यात तर ओला-उबरने मोठं प्रस्थ निर्माण केलं आहे. त्यात आता मारुती-सुझुकीसारख्या वाहन क्षेत्रातील प्रस्थापित कंपनीने प्रवेश केल्यास, आगामी काळात प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची आणि ऑटो क्षेत्रात संपर्धेची स्थिती दिसून येईल, एवढे निश्चित.