
VB-G RAM Vs MGNREGA: गेल्या दोन दशकांपासून देशात रोजगार हमी योजनेतंर्गत अनेक कामं पूर्ण झाली. रस्ते, नाला, सामाजिक वनीकरण, समतल चर खोदण्यापासून अनेक कामांसाठी रोजगार हमी योजनेचा मोठा फायदा झाला. गोरगरिबांच्या हाताला काम मिळाले. दुष्काळ, उन्हाळ्यात गावालगतच रोजगार मिळाला. चार पैसे गाठी आले. अर्थात या योजनेतील भ्रष्टाचारही तितकाच गाजला. जॉबकार्डमधील घोटाळे बाहेर आले. सरकारच्या पैशांवर दुसर्यांनीच मलिदा लाटला. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGA) इतिहासजमा झाला आहे. त्याऐवजी मोदी सरकारने नवीन VB-G RAM G अधिनियम आणला आहे. विकसीत भारत-रोजगार आणि उपजीविका अभियान(ग्रामीण) असं या योजनेचं नावच बदललं नाही तर एकूण संरचनेत आणि उद्दिष्टातही बदल करण्यात आला. विरोधकांनी सरकारच्या या कृतीवर अर्थातच कडाडून हल्ला चढवला. सरकार सामाजिक उत्तरदायित्वातून सूटका करून घेत असल्याचा आरोप मोदी सरकारवर आहे. काही दिवसांनी ही योजनाच गुंडाळली जाणार आहे. आता त्याची सुरुवात झाल्याचा काँग्रेससह विरोधकांचा आरोप आहे. सरकारचा हा डाव असल्याचा आणि हा कावा ओळखण्याचे आवाहन विरोधकांनी केले आहे. त्यामुळे या नवीन रोजगार हमीविषयी...