Explained: रोगापेक्षा इलाज भयंकर… पेट्रोलमध्ये इथेनॉल… सध्याची वाहनं भंगारात जाणार? E20 नंतर E30 मुळे काय परिणाम होणार?

Ethanol Blending in Petrol: E20 नंतर केंद्र सरकारने आता E22, E25, E27 आणि E30 मिश्रीत पेट्रोल विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पेट्रोलची आयात होईल, प्रदूषण घटेल पण पेट्रोल स्वस्त होईल का? सध्याची वाहनं भंगारात निघणार का? अशी अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत.

Explained: रोगापेक्षा इलाज भयंकर... पेट्रोलमध्ये इथेनॉल... सध्याची वाहनं भंगारात जाणार? E20 नंतर E30 मुळे काय परिणाम होणार?
इथेनॉल देशाला संकटातून वाचवणार?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 20, 2026 | 9:51 AM

E30 in Petrol Decision by Modi Government: केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युरो ऑफ स्टँडर्डने (BIS) E22, E25, E27 आणि E30 इंधनासाठी मानक जाहीर केली आहेत. देशात सध्या E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोलची विक्री होते. सरकार आता त्यापुढे पाऊल टाकणार आहे. पण यामुळे वाहनात पेट्रोल टाकताना काळजी घ्यावी लागणार आहे. सध्याची आणि गेल्या 20 वर्षांतील अनेक वाहनधारकांना E20 पेट्रोलमुळे मनस्ताप होत असल्याच्या मध्यंतरी तक्रारी आल्या होत्या. यामुळे वाहनांच्या इंजिनची सर्व्हिसिंग लवकर करावी लागत असल्याचा आरोप करण्यात येत होता. तर काहींनी या पेट्रोलमुळे इंधन टाकीत पाणी होत असल्याचा आरोप केला होता. त्यात आता जर चुकून अधिक प्रमाणातील इथेनॉल टाकले तर त्याचा जुन्या वाहनांवर काय परिणाम होणार याची चिंता वाहनधारकांना सतावत आहे. ग्रामीण भागात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलविषयी अधिक गैरसमज आहे. ते दूर केले नाही तर अगोदरच पेट्रोल दरवाढ आणि विस्कळीत पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांचा असंतोष उफाळून येईल. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us