
केदारनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी एक आनंदवार्ता आहे. त्यांना आता 8-9 तासांची कठीण पदयात्रा करावी लागणार नाही. ते आता केवळ 36 मिनिटात केदारनाथ येथे पोहचतील. रोपवे प्रकल्पाद्वारे ते बाबा केदारनाथचे दर्शन घेऊ शकतील. हा रोपवे जवळपास 13 किलोमीटर लांब आहे. याप्रकल्पासाठी केंद्र सरकारने 4,081 कोटी रुपयांच्या PPP पद्धतीला मंजूरी दिली आहे. हा प्रकल्प येत्या सहा वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आहे. तर या प्रकल्पाचे काम, देखरेख पुढील 35 वर्षांपर्यंत खासगी कंपनीला देण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून गौतम अदानी हे सुद्धा सरकारची कमाई वाढवतील.
किती देणार पैसे
या रोपवे प्रकल्पासाठी अदानी इंटरप्रायजेसने 42% महसूल वाट्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकूण चार पैकी तीन निविदाधारकांनी NHLML (नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड) साथ महसूलात भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. रोपवे प्रोजेक्ट Tri-cable Detachable Gondola (3S) तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ज्यामध्ये एकावेळी 36 यात्रेकरू जाऊ शकतील. रोज 18,000 आणि वर्षभरात 32 लाख भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
काय आहे रोपवे प्रोजेक्ट?
केदारनाथ रोपवे हा पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. हा जगातील सर्वात मोठा रोपवे असेल. हा रोपवे सोनप्रयाग ते केदारनाथ धामपर्यंत असेल. हा रोपवे तयार केल्यानंतर केदारनाथ येथे येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना मोठी सुविधा मिळेल. पहिल्या टप्प्यात गौरीकुंड ते केदारनाथ धामपर्यंत 9.7 किमी लांब रोपवे तयार करण्यात येईल.
ही योजना केवळ केदारनाथपर्यंत मर्यादीत नाही. गोविंदघाट-घांघरिया-हेमकुंड साहिबपर्यंत 12.4 किमी लांब दुसरा रोपवे प्रकल्पासाठी पण बोली लावण्यात येईल. या प्रकल्पासाठी जवळपास 2,730 कोटींचा खर्च येईल आणि प्रत्येक दिवशी 11,000 यात्रेकरू त्याचा वापर करतील. या रोपवेमुळे केवळ भक्तांचा त्रास वाचणार नाही तर सरकारला चांगली आमदनी मिळेल. सरकारच्या महसूलात वाढ होईल. उत्तराखंड आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. रोपवे प्रोजेक्ट Tri-cable Detachable Gondola (3S) तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ज्यामध्ये एकावेळी 36 यात्रेकरू जाऊ शकतील. रोज 18,000 आणि वर्षभरात 32 लाख भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.