देशातील पहिले खरबपती; मुकेश अंबानी यांची संपत्ती अशी वाढली, यशाचा चढता आलेख माहिती आहे का?
Happy Birthday Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्याकडे आज अब्जावधींची संपत्ती आहे. कुटुंबातील मोठा मुलगा म्हणून ते वडिलांचा वारसा सतत उंचावत आहेत. अंबानी कुटुंबातील शाही लग्नं, आलिशान कार,, 4.6 अब्ज डॉलरचे 27 मजल्यांची अँटिलियाची जगभर चर्चा आहे.

जगातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आहे. जगातील टॉप कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे आज अब्जावधींची संपत्ती आहे. कुटुंबातील मोठा मुलगा म्हणून ते वडिलांचा वारसा सतत उंचावत आहेत. अंबानी कुटुंबातील शाही लग्नं, आलिशान कार,, 4.6 अब्ज डॉलरचे 27 मजल्यांची अँटिलियाची जगभर चर्चा आहे.
केव्हा झाले खरबपती?
ऑक्टोबर 2007 मध्ये मुकेश अंबानी यांनी बिल गेट्स, कार्लोस स्लिम आणि वॉरेन बफेट या सारख्या दिग्गजांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला होता. त्यावेळी त्यांची संपत्ती जवळपास 63.2 अब्ज डॉलर होती. तर गेट्स आणि स्लिम यांची संपत्ती 62.29 अब्ज डॉलर संपत्ती होते. अंबानी यांची संपत्ती 13 वर्षांमध्ये 25 अब्ज डॉलरहून अधिक होती.
त्याच दरम्यान अनिल अंबानी यांच्यासह मुकेश अंबानी यांचे कुटुंबिय शेअर बाजारात 100 अब्ज डॉलरच्या संयुक्त संपत्तीसह भारताचे सर्वात श्रीमंत कुटुंब ठरलं. शेअरमधील तेजीमुळे अनिल अंबानी यांची संपत्ती 38.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली होती. त्यावेळी ही संपत्ती वॉलमार्टच्या वॉल्टन कुटुंबाच्या संपत्तीपेक्षा अधिक होती.
मुकेश अंबानी यांची रँकिंग?
जगाने मंदीचे वारे अनुभवले आहे. पण मुकेश अंबानी आजही जागतिक अब्जाधीशांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर आहे. त्यांचा अब्जाधीश होण्याचा प्रवास 1981 मध्ये सुरू झाला होता. त्यांनी वडील धीरुभाई अंबानी यांच्या कारभारात मदत सुरू केली होती. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या 18 व्या वर्षीच रिलायन्सचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली होती. 1981 पासून ते रिलायन्समध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज हे नावच या समूहाने 1985 मध्ये स्वीकारले होते. भविष्यातील रणनीती ठरविण्यात मुकेश अंबानी यांचा हातखंड असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या नेतृत्वात रिलायन्सने 2007 पर्यंत 100 अब्ज डॉलरचे मार्केट कॅप ओलांडले.
मुकेश अंबानी यांच्यापूर्वी रिलायन्स टेक्सटाईल आणि केमिकल्स क्षेत्रात अग्रेसर होती. पण मोठा उद्योग समूह व्हायचे असेल तर केवळ दोन क्षेत्रावर कसं भागणार? या विचाराने मुकेश अंबानी यांना पछाडलं. ते स्वतः केमिकल इंजिनिअर होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शिक्षण त्यांना अर्ध्यावरच सोडून परताव लागलं होते. त्यांनी रिलायन्समध्ये मोठे बदल घडवून आणले. त्यांनी पेट्रोकेमिकल क्षेत्राची सुरुवात केली. रिलायन्स आता केवळ पेट्रोकेमिकल पूरतीच मर्यादीत राहिली नाही तर टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात तिने मोठी झेप घेतली आहे. भविष्यात ऊर्जा क्षेत्रात पण कंपनी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे. ग्रीन एनर्जी, अक्षय ऊर्जा क्षेत्रात पण कंपनीने मोठी योजना आखली आहे.
