
शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यात मोठी तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यात बीएसईमध्ये सूचीबद्ध टॉप-10 मध्ये 6 कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये 1.18 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली. सर्वाधिक फायदा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि TCS च्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत कोट्यवधींची वाढ झाली आहे.
देशातील टॉप 10 मौल्यवान फर्मच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात 1,18,626.24 कोटी रुपयांची वाढ झाली. टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेजला सर्वाधिक लाभ झाला आहे. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 659.33 अंक अथवा 0.83 टक्के वधारला. तर एनएसई निफ्टी 187.7 अंक अथवा 0.78 टक्के वधारला.
सर्वाधिक फायदा कुणाला झाला?
या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, HDFC Bank, टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेज, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस आणि आयटीसीचे मूल्यांकन वाढले. तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आणि हिंदुस्थान युनिलिव्हर मूल्यांकन कमी झाले. टीसीएसचे बाजार मूल्यांकन 53,692.42 कोटी रुपये वाढून 12,47,281.40 कोटी रुपये झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 34,507.55 कोटी रुपये जमा केले आणि तिचे मूल्यांकन 17,59,276.14 कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे बाजार मूल्यांकन 24,919.58 कोटी रुपये वाढून 6,14,766.06 कोटी रुपये आणि एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन 2,907.85 कोटी रुपये वाढून 14,61,842.17 कोटी रुपये झाले.
या कंपन्यांना झाले नुकसान
तर दुसरीकडे भारती एअरटेलचे मूल्यांकन 41,967.5 कोटी रुपयांनी कमी होऊन 10,35,274.24 कोटी रुपये आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्यांकन 10,114.99 कोटी रुपये कमी होऊन 5,47,830.70 कोटी रुपयांवर आले. तर बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेचे बाजारातील भांडवल कमी झाले.
किती आहे रँकिंग ?
रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक मौल्यवान कंपनीचा किताब कायम ठेवला आहे. त्यानंतर HDFC Bank, टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेज, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसीचा क्रमांक लागला.
पुढील आठवड्यात कसा राहिल बाजार?
बाजारातील तज्ज्ञानुसार, 28 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या भारतीय शेअर बाजारात सतर्कतेचा इशारा दिला आहे. तांत्रिक संकेतानुसार, निफ्टीत अधिक घसरण होण्याची शक्यता आहे. तर स्थानिक गुंतवणूकदार बाजारात पैसा ओतण्याची शक्यता आहे. सध्या या अनिश्चिततेच्या वातावरणात बाजारात गुंतवणूक आणि व्यापार हे गुंतवणूकदारांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.