AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : India-Pak तणाव, वाढवली आयपीएलची सुरक्षा, स्टेडियमवर तैनात ही खास यंत्रणा

IPL 2025 Security : भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तणाव वाढला आहे. यु्द्धाचे ढग जमा होत आहे. दरम्यान भारतात सुरू असलेल्या आयपीएल 2025 टुर्नामेंटची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर ही खास यंत्रणा दिमतीला लावण्यात आली आहे.

IPL 2025 : India-Pak तणाव, वाढवली आयपीएलची सुरक्षा, स्टेडियमवर तैनात ही खास यंत्रणा
आयपीएल 2025 सुरक्षाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 27, 2025 | 2:04 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतात तीव्र संताप आहे. त्यातच नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने सीमा रेषेवर रणगाडे तैनात केले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग गडद होत आहेत. दरम्यान भारतात सुरू असलेल्या आयपीएल 2025 टुर्नामेंटची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ही खास यंत्रणा दिमतीला लावण्यात आली आहे.

स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टम

बिग बँग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड BBBS ने शनिवारी देशभरात जिथे इंडियन प्रीमियर लिगचे सामने खेळण्यात येत आहे, तिथे स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टिम कार्यान्वीत केली आहे. वज्र सुपर शॉट सुद्धा तैनात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वज्र सुपर शॉट हे एक हलके, हातात धरण्याजोगे अँटी ड्रोन शस्त्र आहे. ते 4 किलोमीटर दूरपर्यंतच्या ड्रोनचा लागलीच शोध घेते आणि शत्रूच्या ड्रोन कम्युनिकेशन सिग्नल तोडते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.

BBBS ने याविषयी एका पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, ही प्रणाली पोर्टेबिलिटी आणि अनुकूल फ्रिक्वेन्सी जॅमिंगसह समोरच्या शस्त्राला प्रभावित करते. राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वदेशी रक्षा प्रणाली विकसीत करण्यासाठी बीबीबीएस नेहमी तत्पर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर स्टेडियमच्या जवळपास एखादे फ्लाईंग ऑब्जेक्ट, ड्रोन वा इतर एखादी यंत्रणा आकाशात दिसली तर हे अँटी ड्रोन सिस्टिम त्याचे कम्युनिकेशन सिग्नल डॅमेज करते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला बाधा येत नाही.

या सिस्टिमचा आयपीएल 2025 मधील 43 व्या, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद या दोन संघाच्या सामन्या दरम्यान पहिल्यांदा करण्यात आला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे स्टेडियमवर खुल्या आकाशातून सुरक्षा यंत्रणेला धोका होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्यासाठी स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.