AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terrorist Attack : ‘कसं माहिती झालं की दहशतवादी पाकिस्तानातून आले?’ शं‍कराचार्यांच्या वक्तव्याने वादाला फोडणी

Kashmir Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात केव्हा पण युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर यांनी मोदी सरकारवर मोठा निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्याने वादाला फोडणी बसली आहे

Pahalgam Terrorist Attack : 'कसं माहिती झालं की दहशतवादी पाकिस्तानातून आले?' शं‍कराचार्यांच्या वक्तव्याने वादाला फोडणी
शंकराचार्यांच्या वक्तव्याने वादImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 27, 2025 | 2:08 PM
Share

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यात 26 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रत्येकाच्या मनात असंतोष खदखदतोय. त्याचवेळी जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर यांनी मोदी सरकारवर मोठा निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्याने वादाला फोडणी बसली आहे

काय म्हणाले शंकराचार्य?

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वृत्तसंस्था ANI ला या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया दिली. “सर्वात मोठी अडचण ही आहे की जेव्हा आपल्या घरात आपण चौकीदार ठेवला आहे आणि आपल्या घरात जर काही घटना घडली तर आपण सर्वात अगोदर कोणाला दोषी धरणार? सर्वात अगोदर चौकीदाराला पकडू, त्याला विचारू तू कुठे होता? ही घटना घडली कशी? पण येथे तर असं काहीच घडत नाहीये.” अशी घणाघाती टीका स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केली. “ते म्हणतात की आम्ही चौकीदार आहोत. पण जर ते खरंच चौकीदार असते तर कोणी असं आक्रमण केलं नसतं, असा हल्ला केला नसता.” अशी टीका पण त्यांनी केली.

दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय?

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सवाल केला की, “कोणी त्या दहशतवाद्यांना अटकावच केला नाही, त्यांना कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ते आले. त्यांनी हल्ला केला आणि आरामात निघून गेले. कुठेच त्यांना त्रास झाला नाही. मग सहाजिकच प्रश्न येतो की चौकीदार कुठे होता?”

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

“चौकीदाराविषयी कुठेच काही चर्चा होत नाहीये. ते सांगत आहेत की, ते पाकिस्तानला धडा शिकवतील. पण दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही, हे इतक्या लवकर कसं माहिती झालं? ही गोष्ट हा हल्ला घडण्यापूर्वी का नाही समजली? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” असे शंकराचार्य म्हणाले.

सिंधूचे पाणी अडवण्यासाठी 20 वर्षे लागतील

भारत सरकारने सर्वात जुना सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्याचे जाहीर केले आहे. त्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले. तुम्ही पाणी अडवण्याचे जाहीर केले पण पाणी थांबवण्यासाठी अथवा ते दुसरीकडे वळवण्यासाठी तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? असा सवाल त्यांनी केला. तुम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारले तर ते सांगतील. तज्ज्ञांच्या मते आपल्याकडे अशी काही व्यवस्था नाही. जर आज आपण काम सुरु केले तर कमीत कमी 20 वर्षे लागतील.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत