AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SC on Shiv Sena Party and Symbol Case LIVE : पक्ष आणि चिन्हावरील कोर्टातील सुनावणी संपली..

| Edited By: | Updated on: Aug 18, 2026 | 10:08 PM
Share

SC on Shiv Sena Party and Symbol Case Hearing LIVE Updates in Marathi : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली. कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरे गटाच्या बाजूने युक्तीवाद केला जातोय.

SC on Shiv Sena Party and Symbol Case LIVE : पक्ष आणि चिन्हावरील कोर्टातील सुनावणी संपली..
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेImage Credit source: Tv9

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ही सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी कोर्टात सुरू झाली. कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद कोर्टात केला जात आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाईल. या सुनावणीकडे राज्याच्या नजरा आहेत. कपिल सिब्बल कोर्टात अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलतील. यासोबतच यापूर्वीच्या सुनावणीत त्यांनी थेट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाने त्यांच्या कक्षाबाहेर जाऊन काम केल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच निवडणूक आयोगाकडून मिळालेली पोहोच पावतीही त्यांनी कोर्टात दाखवली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Aug 2026 10:03 PM (IST)

    विलास घुले खून प्रकरणातील 9 आरोपींना ॲट्रॉसिटी गुन्ह्यात चार दिवसांची पोलिस कोठडी

    बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणातील 9 आरोपींना IPS वेंकटराम यांच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 21 ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  -उमेश माने याच्या तक्रारीवरून आरोपींवर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर मूळ खुनाच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

  • 18 Aug 2026 09:54 PM (IST)

    आपल्याला कुत्र चावले तर आपण कुत्र्याला चावायचे नसते – अमोल कोल्हे यांची टीका

    तुम्ही निवडून दिलेले खासदार जिवंत आहेत का? असा प्रश्न विचारत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी खा. अमोल कोल्हे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. तसेच पत्रकारांवर सुद्धा अरेरावी केली होती.  आता यावर कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधीने माध्यम प्रतिनिधींना अशा पद्धतीने बोलणे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.  “आपल्याला कुत्र चावले तर आपण कुत्र्याला चावायचे नसते” असे प्रतिउत्तर त्यांनी दिलं.

  • 18 Aug 2026 09:47 PM (IST)

    जळगावात सोने चांदीचे दागिने घडवणाऱ्या कारागिराची 2 कोटींची फसवणूक

    जळगावात सोने चांदीचे दागिने घडवणाऱ्या कारागिराची 2 कोटी 45 लाख 74 हजार रुपयांची फसवणूक झाली.  याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या विद्युत बाग व राजू चौधरी या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  22 कॅरेट सोन्याचे तब्बल1  किलो 755 ग्रॅम तयार दागिने घेऊन दोघेही फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 18 Aug 2026 09:45 PM (IST)

    एसआयआर अभियानाच्या दृष्टीने प्रदेश भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

    एसआयआर अभियानाच्या दृष्टीने प्रदेश भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक.  मुंबई भाजपच्या दादर येथील पक्षकार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं.  मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बैठकीला हजर होते. आगामी काळातील संघटनात्मक बाबी आणि SIR संदर्भातील नियोजनावर मार्गदर्शन करण्यात आलं.

  • 18 Aug 2026 09:44 PM (IST)

    बीड गेवराईत अवैध वाळू वाहतुकीसाठी 70 हजारांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

    बीडच्या गेवराई तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे अनधिकृत वाळू उपसा आणि हायवा गाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची तलाठी विलास मोराचे याने लाच मागितली होती. तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी विलास मोराळे याला छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने गेवराईतील नाईकनगर भागात रंगेहात पकडले.

  • 18 Aug 2026 05:06 PM (IST)

    उद्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा…

    पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत. उद्या कपिल सिब्बल यांची सुनावणी संपेल.

  • 18 Aug 2026 04:49 PM (IST)

    उद्या पक्ष आणि चिन्हावर सुनावणी..

    उद्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून होणार युक्तीवाद

  • 18 Aug 2026 04:30 PM (IST)

    गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झालेयत, त्यांना माझ्या शुभेच्छा-छगन भुजबळ

    गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झालेयत, त्यांना माझ्या शुभेच्छा, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. खड्डे बुजवणं मोठं चॅलेंज आहे. कुभं मेळ्यापुर्वी पालकमंत्र्यांनी काम करायला पाहिजे. मी बरंच वर्ष पालकमंत्री पद सांभाळलं मला आस आहे असं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आलो आहेत पण हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. गिरीश महाजन यांच्यावर काही आरोप होत असतील तर त्याचं उत्तर ते देतील. माझं कधीच डोकं दुखत नाही. मी कधीही इच्छा जाहीर केली नाही, पालकमंत्री न मिळाल्याने माझं महत्व कमी झालं नाहीये, असा टोलाही त्यांनी लगावला.

  • 18 Aug 2026 04:24 PM (IST)

    उद्या कपिल सिब्बल यांची सुनावणी संपणार

    कोर्टात पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. उद्याही कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद होईल. उद्या त्यांचा युक्तीवाद संपेल.

  • 18 Aug 2026 04:18 PM (IST)

    नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दोन लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी

    राज्य सरकारकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.. आम्ही नियमित कर्ज फेडून देखील आम्हाला पन्नास हजार रुपयांची कर्जमाफी करून आमच्यावर अन्याय केला जातोय अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देऊन आम्हाला देखील दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे.

  • 18 Aug 2026 04:04 PM (IST)

    उद्या कपिल सिब्बल संपवणार युक्तीवाद…

    कोर्टात पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली. यादरम्यान कपिल सिब्बल यांनी मोठे दावे केले. उद्या कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपेल.

  • 18 Aug 2026 03:56 PM (IST)

    आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात- कपिल सिब्बल

    परिच्छेद 10\1 ब नुसार, आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात, असे कोर्टात कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे

  • 18 Aug 2026 03:55 PM (IST)

    2018 च्या घटनेनुसार, 39 जण निवडून आले

    त्यांचा मुद्या राजकीय आणि आमचा मुद्दा विधीमंडळातला आहे. 2018 च्या घटनेनुसार, 39 जण निवडून आले.

  • 18 Aug 2026 03:52 PM (IST)

    निवडणूक आयोगावर मोठे प्रश्नचिन्ह

    मग आयोगाकडे कोणते संविधान याचे अध्यक्षांना काही देणे घेणे नसल्याचे कोर्टात म्हणण्यात आले.

  • 18 Aug 2026 03:50 PM (IST)

    शिवसेना पक्षात फुट नाहीच- कपिल सिब्बल

    कपिल सिब्बल यांनी मोठा दावा केला. कपिल सिब्बल यांनी म्हटले की, शिवसेना पक्षात फुट पडली नव्हतीच फुट ही विधीमंडळात पडली होती.

  • 18 Aug 2026 03:49 PM (IST)

    शिवसेना कोणाची, कोर्टात काय काय घडतंय, जाणून घ्या एका क्लिकवर

    शिवसेना ठाकरे गटाकडून कोर्टात कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींवर युक्तीवाद केला.

  • 18 Aug 2026 03:43 PM (IST)

    इथे राजकीय नाही तर विधीमंडळात पक्ष फुटला होता-कपिल सिब्बल

    इथे राजकीय नाही तर विधीमंडळात पक्ष फुटला होता, असा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.

  • 18 Aug 2026 03:43 PM (IST)

    2018 च्या घटनेनुसार 39 जण निवडून- कपिल सिब्बल

    2018 च्या घटनेनुसार 39 जण निवडून आल्याचे कोर्टात कपिल सिब्बल यांनी म्हटले. जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात आहे.

  • 18 Aug 2026 03:40 PM (IST)

    नेते, आमदार, मंत्री झाले आणि त्याच पक्षाच्या घटनेवर प्रश्नचिन्ह- कपिल सिब्बल

    नेते, आमदार, मंत्री झाले आणि त्याच पक्षाच्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

  • 18 Aug 2026 03:38 PM (IST)

    मुख्य नेता पद घटनेत आहे का?

    शिंदे 2018 च्या घटनेनुसार, आमदार, मंत्री झाले. सगळे अधिक पक्षप्रमुखांकडेच आहेत.

  • 18 Aug 2026 03:36 PM (IST)

    पक्षप्रमुखांना सर्व अधिकार आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आहेत- कपिल सिब्बल

    पक्षप्रमुखांना सर्व अधिकार आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आहेत, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.

  • 18 Aug 2026 03:30 PM (IST)

    2018 ला शिंदेंना मुख्यनेते केले हे आयोगाला कळवले का? मोठा सवाल..

    2018 ला शिंदेंना मुख्यनेते केले हे आयोगाला कळवले का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

  • 18 Aug 2026 03:29 PM (IST)

    अध्यक्ष म्हणतात आमचा निर्णय वेगळा आयोगाचा वेगळा

    अध्यक्ष म्हणतात आमचा निर्णय वेगळा आयोगाचा वेगळा…. कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद

  • 18 Aug 2026 03:24 PM (IST)

    अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत- कपिल सिब्बल

    कपिल सिब्बल यांनी कोर्टातील सुनावणीदरम्यान म्हटले की, अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत.

  • 18 Aug 2026 03:24 PM (IST)

    बंडखोरीनंतर शिंदेंनी गोगावले यांना प्रतोद केले- कपिल सिब्बल

    गोगावले यांना कोणत्या कायद्याने प्रतोद केले, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केला

  • 18 Aug 2026 03:21 PM (IST)

    शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच- कबिल सिब्बल

    सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी मोठा युक्तीवाद केला. कपिल सिब्बल यांनी म्हटले की, शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदाप अपात्रतच होते.

  • 18 Aug 2026 03:19 PM (IST)

    शिंदेंच्या बाजूने व्हिप जारी होऊ शकत नाही- कपिल सिब्बल

    नुकताच कोर्टातील सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटले की, शिंदेंच्या बाजूने व्हिप जारी होऊ शकत नाही.

  • 18 Aug 2026 03:15 PM (IST)

    घेतलेले निर्णय कायद्याबाहेरचे- कपिल सिब्बल

    कपिल सिब्बल यांनी कोर्टातील सुनावणीदरम्यान म्हटले की, घेतलेले निर्णय कायद्याबाहेरचे आहेत.

  • 18 Aug 2026 03:14 PM (IST)

    पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्नचिन्ह- कपिल सिब्बल

    पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटले आहे.

  • 18 Aug 2026 03:13 PM (IST)

    पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार- कपिल सिब्बल

    संख्या कमी असली तरीही पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

  • 18 Aug 2026 03:10 PM (IST)

    अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली- कपिल सिब्बल

    अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली. सोडून गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटीसकडे दुर्लक्ष केले.

  • 18 Aug 2026 03:09 PM (IST)

    अगोदर 16 आमदार गेले त्यानंतर 10- कपिल सिब्बल

    अगोदर 16 आमदार गेले त्यानंतर 10 गेले असे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी म्हटले.

  • 18 Aug 2026 03:08 PM (IST)

    आमच्याकडे 55 होते, त्यानंतर हळूहळू 39 शिंदेंकडे गेल्याचे कपिल सिब्बल

    आमच्याकडे 55 होते, त्यानंतर हळूहळू 39 शिंदेंकडे गेल्याचे कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटले.

  • 18 Aug 2026 03:08 PM (IST)

    आमची संख्या 55 होती- कपिल सिब्बल

    आमची संख्या 55 होती, असा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.

  • 18 Aug 2026 03:04 PM (IST)

    निवडणूक आयोगाने अपात्रतेची वाट बघायला हवी होती- कपिल सिब्बल

    सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने अपात्रतेची वाट बघायला हवी होती.

  • 18 Aug 2026 03:02 PM (IST)

    कोण आमदार कुठे? यावर निर्णय घेणे चुकीचे होते- कपिल सिब्बल

    कोण आमदार कुठे? यावर निर्णय घेणे चुकीचे होते, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

  • 18 Aug 2026 03:00 PM (IST)

    ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष- कपिल सिब्बल

    कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान म्हटले की, ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष..

  • 18 Aug 2026 02:59 PM (IST)

    सिब्बल यांच्याकडून सुभाष देसाई केसचा दाखल

    सिब्बल यांच्याकडून सुभाष देसाई केसचा दाखल. यासोबतच कलम 10 चा त्यांनी दाखला दिला आहे

  • 18 Aug 2026 02:58 PM (IST)

    आमदार अपात्रतेवर मी बोलणार- कपिल सिब्बल

    कपिल सिब्बल यांनी म्हटले की, मी आमदारांच्या अपात्रतेवर बोलणार आहे.

  • 18 Aug 2026 02:58 PM (IST)

    मी अपात्रतेवर बोलणार- कपिल सिब्बल

    सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू झाली. यादरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटले की, मी अपात्रतेवर बोलणार आहे.

  • 18 Aug 2026 02:36 PM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू

    शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली. आज कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद केला जाईल.

  • 18 Aug 2026 02:27 PM (IST)

    दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या जामिनाविरोधात SC मध्ये जाणार- डॉ. हमीद दाभोलकर

    डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर झाला असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी शरद कळसकर याच्या जामिनाविरुद्धही सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते आणि आता दोन्ही प्रकरणांवर एकत्रित सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ हमीद दाभोळकर यांनी सांगितले.

  • 18 Aug 2026 02:20 PM (IST)

    रास्ता रोको आंदोलन केल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यासह १९ जणांवर गुन्हा

    कर्जत तालुक्यातील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली काळदात इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. युवकांवरील कथित खोटे गुन्हे मागे घेण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज आणि ग्रामस्थांचा त्यात सहभाग होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं त्यांनी उल्लंघन केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सार्वजनिक रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 18 Aug 2026 02:10 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा रद्द

    मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा रद्द झाला आहे. जरांगे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर 20 ऑगस्टपासून मराठवाडा दौरा होणार होता. या दौऱ्याची आखणी देखील करण्यात आली होती, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मराठवाड्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी अंतरवाली सराटीत गोदापट्ट्यातील गावांची बैठक होणार आहे. यानंतर 29 ऑगस्टच्या आंदोलनाला सुरुवात होईल. हे आंदोलन अंतरवाली सराटीत होणार की मुंबईत हे अजून स्पष्ट नाही. दरम्यान आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठीच्या परवानगीकरिता अर्ज देण्यात आलेला आहे.

  • 18 Aug 2026 01:55 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांनी चाकणमधील दुरावस्थांवरुन सरकारवर केला हल्लाबोल

    आदित्य ठाकरे म्हणाले, “चाकणमधील 20 कंपनी दुसऱ्या राज्यात शिफ्ट होणार आहेत. तिथं मोठी समस्या आहेत. चाकण दौरा केल्यानंतर हिंजवडी चा दौऱ्या करण्याबाबत आयटी अभियंत्यांनी सांगितलं. हिंजवडीत अनेक ठिकाणी फुटपाथ नाही, मेट्रोच्या उदघटनाची तारीख मिळत नाही. गेल्या तीन चार वर्षात कुठलीच कंपनी आली नाही. तीन ते चार तास वाहतूक कोंडीत आयटी अभियंते अडकत आहेत. राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने लक्ष द्यावे, यामुळे अनेकांच्या नोकऱ्या वाचतील.”

  • 18 Aug 2026 01:45 PM (IST)

    नागपुरातील शाळांना खलिस्तानी संघटनेच्या नावे मेलवरुन धमकी मिळाली

    नागपुरातील 12 शाळांना आणि 3 सरकारी शाळांना धमकी देण्यात आली आहे. 12 शाळांना आणि तीन सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. शाळेमध्ये कुठलीही संशायास्पद वस्तू आढळली नाही. खलिस्तानी संघटनेच्या नावे मेलवरुन धमकी मिळाली.

  • 18 Aug 2026 01:44 PM (IST)

    हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाची प्रतीक्षा

    हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाची प्रतीक्षा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्याहून अधिक पावसाची तूट.  जुलै मध्ये काही प्रमाणात तुट भरुन निघाली आहे माञ ऑगस्ट मध्ये अनेक जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची मोठी तुट. ऑगस्ट मध्ये नाशिक, पुणे, सातारा जिल्हे सोडले तर इतर ठिकाणी पावसाची स्थिती गंभीर आहे. पावसाचं प्रमाण कमी असल्याने त्याचा थेट परिणाम शेती वरती होताना दिसत आहे.. मराठवाडा, विर्दभ मध्ये कमी पाऊस. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.

  • 18 Aug 2026 01:40 PM (IST)

    जालन्यात भीमशक्ती संघटनेच्या वतीने भाजपच्या विरोधात मुंडन करून निषेध आंदोलन

    कांग्रेस चे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज ठिकठिकाणी भाजपच्या विरोधात मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आज चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने भीमशक्ती संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आला असून पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपचा निषेध व्यक्त केलाय. येत्या काळात चंद्रकांत हंडोरे आम्हाला जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू असा इशारा दिलाय.

  • 18 Aug 2026 01:34 PM (IST)

    मुंबईतील एयर पोर्ट टर्मिनल 2 वर ओला ऊबर चालकांच्या विरोधात आंदोलन सुरु

    मुंबईतील एयर पोर्ट टर्मिनल 2 वर प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा कामगार संघटनेचं मोठ्या संख्येत ओला ऊबर चालकांच्या विरोधात आंदोलन सुरू..उबेर ग्रीन आणि उबर ब्लॅक कायमस्वरूपी बंद करा.. अशी मागणी. भाडे तात्काळ RTO च्या नियमानुसार लागू करा.. अशी प्रमुख मागणी. ओला, उबर, रॅपिडो यांच्या विरोधात एअरपोर्टवर वाहतूक बंदची दिलीये हाक

  • 18 Aug 2026 01:30 PM (IST)

    मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेकडून ‘खाद्यसंस्कृती दहशतवादा’विरोधात बॅनरबाजी

    मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेकडून ‘खाद्यसंस्कृती दहशतवादा’विरोधात बॅनरबाजी. खाद्यसंस्कृतीवरून एखाद्याला घर नाकारलं जातं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते खपवून घेणार नाही , खाद्यसंस्कृतीचा दहशतवाद मोडून काढू’ असा मजकूर या बॅनरवर झळकवण्यात आला आहे. घाटकोपर मध्ये गुजराती भाषिकांचा टक्का जास्त आहे , इथे बिल्डरकडून मराठी माणसाला घर नाकारल्याचा आणि स्थापत्य वागणूक दिल्याचे प्रकार वाढत आहेत, यावर स्थानिक आमदार आणि नगरसेवकांचे लक्ष नसल्याचेही आरोप होतोय. आत्ता मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं बॅनरमधून दिसून येत आहे. या बॅनरची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

  • 18 Aug 2026 01:26 PM (IST)

    सोलापूर महापालिकेत काही तरी मोठं घडणार?

    सोलापूर महापालिकेची आज होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता. शहरातील 9 जागा बीओटी तत्वावर देण्यास महाविकास आघाडीचा तीव्र विरोध आहे.  शहरातील महापालिकेची शाळा, मैदान आणि विविध भूखंड बीओटी तत्वावर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. मात्र विरोधकांनी कालपासूनच या विरोधात निदर्शनास सुरू केले असून आज सभागृहा देखील त्याचे पडसाद पाहायला मिळू शकतात.

  • 18 Aug 2026 01:22 PM (IST)

    नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात सोलापूरात महिला आक्रमक

    नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात सोलापूरात महिला आक्रमक. वाघमारे यांच्या पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला निषेध. शहरातील चार हुतात्मा चौकात नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात अभिनव संस्थेकडून महिलांची जोरदार निदर्शने. नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य. नवनाथ वाघमारेवर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू आंदोलक महिलांचा इशारा.

  • 18 Aug 2026 01:19 PM (IST)

    हिंजवडी आयटी पार्कमधील गंभीर परिस्थितीवरुन आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल

    हिंजवडी आयटी पार्कची आज आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली आहे, यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, हिंजवडी आयटी पार्कमध्ये अनेक ठिकाणी फुटपाथचं नाही, या आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे.

  • 18 Aug 2026 01:16 PM (IST)

    आमदार रोहित पवार कंत्राटदारांच्या आंदोलनात सहभागी

    आझाद मैदानावर राज्यभरातील कंत्राटदारांचे आंदोलन सुरु आहे.  आमदार रोहित पवार कंत्राटदारांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • 18 Aug 2026 01:13 PM (IST)

    धर्म स्वातंत्र्य कायदा 28 तारखेपासून राज्यात लागू होणार

    धर्म स्वातंत्र्य कायदा 28 तारखेपासून राज्यात लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवसापासून हा कायदा लागू होणार आहे. महाराष्ट्र सासनाकडून राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

  • 18 Aug 2026 01:09 PM (IST)

    संजय राऊतांना फोबिया झाला -निरंजन डावखरे

    ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जिथे भाजप तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत या विधानावर भाजप आक्रमक. संजय राऊतांना फोबिया झाला आहे, त्यांना सर्वच पिवळं दिसतं. संजय राऊतांच्या विधानावर भाजप आमदार निरंजन डावखरेंचा पलटवार. आमच्यात एकमत, हम सब साथ है राऊतांच्या टीकेला निरंजन डावखरेंचं उत्तर

  • 18 Aug 2026 01:04 PM (IST)

    नागपूरमधील बारा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

    नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

  • 18 Aug 2026 12:45 PM (IST)

    अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कुलमधील आदिवासी विद्यार्थी मृत्यू व विषबाधा प्रकरण….

    आदिवासी विभागाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. आदिवासी विभागाचे अप्पर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत महर्षी पब्लिक शाळेत चौकशीसाठी दाखल झाले. महर्षी पब्लिक स्कूल मधील सीसीटीव्ही मधील रेकॉर्डिंग जतन नसल्याचा चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला, 15 ऑगस्ट रोजी दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलटी पोट दुखणे व जुलाब व्हायला लागल्याने पाच विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.

  • 18 Aug 2026 12:30 PM (IST)

    नागपूरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस

    नागपूरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. १३ ॲागस्टपासून नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या विभागीय कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे. आदिवासी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी २६ वर्षे वयाची मर्यादा हटवावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ काल संध्याकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आदिवासी विभागाचे मंत्री, आदिवासी विभागाचे सचिव यांच्या सोबत शिष्टमंडळाची  बैठक होणार. गुरुवारी दुपारी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु झालं, आज सहाव्या दिवशीही विद्यार्थी आदिवासी विकास कार्यालयात बसून आहेत.

  • 18 Aug 2026 12:28 PM (IST)

    बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आमरण उपोषणाला सुरुवात

    बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून आदिवासी समाजाच्या सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे, एकनाथ चव्हाण या बंजारा समाज बांधवाने जालना शहरातल्या अंबड चौफुली परिसरात या आमरण उपोषणाला सुरुवात केली असून यापूर्वी बंजारा समाज बांधवांनी दोन वेळा आमरण उपोषण करून देखील ही सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने तिसऱ्यांदा पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली. दरम्यान सरकारने आता दखल घेतली नाही तर येत्या 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्ध नग्न होऊन लोटांगण आंदोलन करण्यात येईल असा इशारा बंजारा समाज बांधवांनी दिलाय.

  • 18 Aug 2026 12:20 PM (IST)

    नवी मुंबईतील दिघा येथे रेल्वे वर दगडफेक करतानाचा विडिओ व्हायरल

    नवी मुंबईतील दिघा येथे रेल्वे वर दगडफेक करतानाचा विडिओ व्हायरल झाला आहे. अजय शिंदे नामक तरुणाने रेल्वे वर दगडफेक करतानाचा रील काढला. दगडफेक करुन रेल्वे प्रवाश्यांना अश्लील हातवारे, रेल्वे पोलिसांनी तात्काळ सदर तरुणाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे,

  • 18 Aug 2026 12:19 PM (IST)

    दिल्ली मोदींच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती…

    महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत राहणार. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. रिकामटेकडे लोक माझ्याबद्दल चर्चा करतात… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 18 Aug 2026 12:07 PM (IST)

    आजपासून मराठी न येणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांवर कारवाई होणार – प्रताप सरनाईक

    आजपासून मराठी न येणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांवर कारवाई होणार. मराठी न आल्यात लगेचचच लायसन्स रद्द होणार नाही. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्यांची नोटीस देणार. तरी मराठी शिकले नाही तर, तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करणार… असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

  • 18 Aug 2026 11:50 AM (IST)

    नवी मुंबईत लोकलवर दगडफेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल

    नवी मुंबईतील दिघा येथे रेल्वेवर दगडफेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अजय शिंदे नामक तरुणाने रेल्वेवर दगडफेक करतानाचा रील काढला. तसेच दगडफेक करुन तरुण रेल्वे प्रवाशांना अश्लील हातवारे करत आहे. आता रेल्वे पोलिसांनी तात्काळ सदर तरुणाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

  • 18 Aug 2026 11:48 AM (IST)

    बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा, जालन्यात आमरण उपोषण सुरू

    बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.  एकनाथ चव्हाण या व्यक्तीने उपोषणाला सुरुवात केली.  बंजारा समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करून आदिवासींच्या सर्व सवलती बंजारा समाजाला लागू कराव्यात ही प्रमुख मागणी आहे.  जालन्यात यापूर्वी दोन वेळेस उपोषण करूनही सरकारने दखल न घेतल्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

  • 18 Aug 2026 11:38 AM (IST)

    मुंबईत काँग्रेसचे भाजपविरोधात मुंडन आदोलन

    मुंबईत काँग्रेसचे भाजपविरोधात मुंडन आदोलन सुरू आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. खासदार हंडोरे यांच्यासहित कांग्रेस कार्यकर्ते मुंडन करून घेत आहे. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

  • 18 Aug 2026 11:30 AM (IST)

    पुण्यात आदिवासी विद्यार्थी आश्रमगृहात विद्यार्थ्यांचं आमरण सुरू

    पुण्यात आदिवासी विद्यार्थी आश्रमगृहात विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण सुरु आहे. हडपसर मांजरी येथील आदिवासी मुलाच्या वसतिगृह येथे उपोषण सुरू आहे. गडचिरोलीमध्ये साप चावून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला १ कोटी ची मदत द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. राज्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेचा १० कोटी रुपये विमा उतरवावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच ५ ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 18 Aug 2026 11:18 AM (IST)

    मंत्री भरत गोगावले घेणार CM फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण

    रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर मंत्री भरत गोगावले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.  वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणार आहेत.  गेली दोन -अडीच वर्ष पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. त्यानंतर काल हा तिढा सुटल्यानंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

  • 18 Aug 2026 11:07 AM (IST)

    विनोद तावडे यांना भाजपकडून उत्तर प्रदेशच्या विधानसभा प्रभारीपदाची जबाबदारी

    भाजपने विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची उत्तर प्रदेशच्या विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भाजपने मोठी जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  • 18 Aug 2026 11:02 AM (IST)

    अहिल्यानगरमध्ये यंदा 98 टक्के पेरणी पूर्ण, पण पावसाची दडी

    अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा तब्बल ९८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.  मात्र, पेरणीनंतर पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांना वाढीसाठी पावसाची गरज असताना पाऊस लांबल्याने पिके कोमेजली आहेत. बियाणे, खते, मशागत आणि पेरणीवर झालेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  तसेच आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांच्या आशेने पेरणी केलेल्या बळीराजाचे आभाळाकडे लक्ष लागलं आहे.

  • 18 Aug 2026 10:50 AM (IST)

    ३४ हजार ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झालेले आहे- आमदार नरेंद्र भोंडेकर

    मागील मार्च महिन्यात रेती घाटा संदर्भातला प्रश्न मी लक्षवेधीमध्ये उपस्थित केला होता. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा भाग घेतला होता. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, ३४ हजार ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झालेले आहे. ७२ कोटी रुपयांचा दंड ठेवण्यात आलेला आहे. जे जे अधिकारी यात आरोपी आहेत, त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली होती. उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) सस्पेंडसुद्धा करण्यात आले होते असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटले

  • 18 Aug 2026 10:40 AM (IST)

    जळगावच्या पारोळ्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

    जळगावच्या पारोळ्यात मध्यरात्री चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. एकाच वेळी तीन ठिकाणी चोरी झाली आहे. पेट्रोल पंप, क्रेन सर्विसचे दुकान आणि हॉटेलला लक्ष्य करत चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली.

  • 18 Aug 2026 10:30 AM (IST)

    फडणवीस मोदींना भेटतात तसं काही लोक शाहांना भेटतात- संजय राऊत

    त्यांची इच्छा आहे मुंबईत, महाराष्ट्रात राहायची मात्र त्यांचं लोक त्यांना ढकलत आहे. तुमच्या सोबत जे लोक आहेत, त्यांना दिल्लीत जाण्याची वाट बघत आहे. देवेंद्र फडणवीस हे मोदींना भेटतात तर काही लोक हे शाहांना भेटतता. ते जव्हा म्हणाले मी पुन्हा येईल तेव्हा ते आले नाही, त्यांन येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली असे संजय राऊत म्हणाले.

  • 18 Aug 2026 10:20 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार- संजय राऊत

    देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्र साध घालत आहे. दिल्लीतली कॅबिनेट हे कमकुवत आहे. नरेंद्र मोदींना कॅबिनट मजबुत करायची आहे म्हणून ते त्यांना दिल्लीत घेत आहे. देवेंद्र फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार स्थिर स्थावर झाल्यावर ते दिल्लीत जातील.

  • 18 Aug 2026 10:10 AM (IST)

    नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना 10 लाखांचे बक्षीस, सकल मराठा समाज आक्रमक

    ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या विरोधात बार्शीतील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना रोख 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाचे नेते डॉ. कपिल कोरके यांच्याकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

  • 18 Aug 2026 10:00 AM (IST)

    नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना रोख 10 लाखांचे बक्षीस जाहीर

    ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या विरोधात बार्शीतील सकल मराठा समाज आक्रमक. नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना रोख 10 लाखांचे बक्षीस जाहीर. सकल मराठा समाजाचे नेते डॉ. कपिल कोरके यांच्याकडून बक्षीस जाहीर.

  • 18 Aug 2026 09:50 AM (IST)

    पुण्यात आंदोलनात एक विद्यार्थी पडला बेशुद्ध

    पुण्यातील मांजरी मध्ये विद्यार्थी आंदोलनात एक विद्यार्थी पडला बेशुद्ध. अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याने विद्यार्थी झाला अशक्त. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. काल रात्री त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर आज सोडण्यात आलं आहे.

  • 18 Aug 2026 09:22 AM (IST)

    चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल

    चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रिअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर महत्त्वाच्या एमएसआरडीसी इंडस्ट्रिअल टाऊनशिप ॲक्टमध्ये परावर्तित करणार. रस्ते, गटारे आणि ड्रेनेजची देखभालही इंडस्ट्रिअल टाऊनशिप अंतर्गत होणार. कचरा, अस्वच्छता आणि सार्वजनिक उपद्रव रोखण्याचे अधिकार अथॉरिटीला जाणार.

  • 18 Aug 2026 09:10 AM (IST)

    बीबी का मकबऱ्यातील हौद बनले चक्क खेळाचे मैदान

    बीबी का मकबऱ्यातील हौद बनले चक्क खेळाचे मैदान. बीबी का मकबरा परिसरात तरुणांची हुल्लडबाजी. ऐतिहासिक वास्तूच्या हौदात उतरून तरुणांचा खेळ.हुल्लडबाजी घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. नियम फक्त फलकांवरच? पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

  • 18 Aug 2026 08:50 AM (IST)

    ‘शोलेच्या दोस्ती’वरून डोंबिवलीत राजकीय वाद! रवींद्र चव्हाणांच्या ‘धोक्याच्या’ इशाऱ्यावर मनसेचा पलटवार

    ‘काचेचे तुकडे उचलणारे कार्यकर्ते आम्ही… शोलेची दोस्ती आहे, पण ज्याच्यासोबत बसतात त्यांनाच सर्वात जास्त जीवाचा धोका’ – राजू पाटील-श्रीकांत शिंदेंच्या जवळिकीवरून रवींद्र चव्हाणांचा अप्रत्यक्ष इशारा. ‘३० वर्षे एकत्र असताना मैत्री आठवली नाही का?’ – ‘काचेचे तुकडे उचलणाऱ्यांनीच डोंबिवलीतील मैदाने चोरली’आधी जनतेची कामं करा, मग इतरांना सल्ले द्या’ मैदानांच्या मुद्द्यावरून हर्षद पाटलांचा रवींद्र चव्हाणवर हल्लाबोल. भाजप आमदार रवींद्र चव्हाण-मनसे शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांच्यातील शाब्दिक युद्धाने कल्याण-डोंबिवलीचं राजकीय वातावरण तापलं.

  • 18 Aug 2026 08:40 AM (IST)

    अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू..

    अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूल मधील धक्कादायक घटना..चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हतरू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले असता उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला. पाच आदिवासी विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती

  • 18 Aug 2026 08:30 AM (IST)

    नागपूरच्या वाघांची डरकाळी देशाच्या वेगवेगळ्या भागात गुंजणार

    गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील वन्यजीव आता देशातील विविध प्राणी संग्रहालयांची शोभा वाढवणार. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने तब्बल आठ महिन्यानंतर अदलाबदल प्रस्तावाला दिली मंजुरी. या प्रस्तावांतर्गत गोरेवाड्यातून चार वाघ पाच वाघिणी आणि दोन बिबटे स्थानांतरित केले जाणार आहेत, तर नागपूरकरांच्या भेटीसाठी हिमालयीन ब्लॅक बियर आणि देखणा रेड जंगल फाऊल पक्षी गोरेवाड्यात दाखल होणार आहे

  • 18 Aug 2026 08:25 AM (IST)

    सोलापुरात आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

    मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात आंदोलन. नवनाथ वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काल मराठा समाजाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने मराठा समाजातर्फे आज आंदोलन करण्यात येणार

  • 18 Aug 2026 08:20 AM (IST)

    लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने मित्राच्या साथीने प्रियकराची घरात चाकूने गळा चिरून केली हत्या

    पुरावा नष्ट करण्यासाठी १८ तास मृतदेह घरात ठेवून नंतर कारमधून नेत कसारा घाटात फेकला. मृतदेह फेकल्यानंतर मुंबई फिरले, आणि रक्ताचे डाग धुतले. वसंत गोरखनाथ सातपुते असे चाळीस वर्षीय मृत व्यक्तीचे नाव. कुठलाही गुन्हा दाखल नसताना गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा आणला उघडकीस. हसिना शेख व तिचा मित्र साहिल शहा आणि साथीदारांनी कारमधून मृतदेह नेल्याची पोलिसांना दिली होती गुप्त माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दोघांना अटक

  • 18 Aug 2026 08:19 AM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी

    शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामध्येच मोठ्या घडामोडी घडणार आहे. सुप्रीम कोर्टात दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरूवात होईल.

  • 18 Aug 2026 06:10 AM (IST)

    तुमसरात शासकीय आदिवासी वसतिगृहात बेमुदत आंदोलन

    आदिवासी विभागाने काढलेल्या जीआरविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा भंडाराच्या तुमसरत उद्रेक झाला.  तुमसरात शासकीय आदिवासी वसतिगृहात बेमुदत आंदोलन करण्यात आलं. आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

Published On - Aug 18,2026 8:17 AM

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता