AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani House: मुकेश अंबानी यांचा एंटील‍िया बनण्यापूर्वी त्या जागेवर काय होते? कोणाची होती ती जागा?

एंटीलिया हे नाव स्पेनमधील एका बेटावरुन घेतले आहे. या घराचे डिझाइन अमेरिकन आर्किटेक्चर कंपनी पर्किन्स अँड विलने तयार केले आहे. या घरात ६०० कर्मचारी काम करतात. एंटिलियामध्ये तीन हेलिपॅड बांधण्यात आले आहेत. २०१० मध्ये इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंबानी परिवार २०११ मध्ये या ठिकाणी राहण्यास आले.

Mukesh Ambani House: मुकेश अंबानी यांचा एंटील‍िया बनण्यापूर्वी त्या जागेवर काय होते? कोणाची होती ती जागा?
mukesh ambani house
| Updated on: Jan 09, 2025 | 6:51 PM
Share

Mukesh Ambani and Nita Ambani: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर जगातील महागड्या घरांपैकी एक आहे. मुंबईत २७ मजली एंटील‍िया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. भव्य-दिव्य असलेल्या या घरात पहिले सहा मजले फक्त कार पार्किंग आहे. १६८ कार या घरात लावता येतात. तसेच जगभरातील लग्झरी सुविधा यामध्ये दिल्या आहेत. जिम, स्पा, थियेटर, टेरेस गार्डन, स्वीमिंग पूल, मंद‍िर या घरात आहे.

एंटील‍ियाची किंमत आज जवळपास १५०० कोटी रुपये आहे. मुंबईत १.१२० एकर जमिनीवर एंटलियाची निर्मिती करण्यात आली आहे. हे घर बांधण्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च आला होता. २००६ मध्ये घराचे काम सुरु झाले ते २०१० मध्ये पूर्ण झाले. जमिनीपासून हे उंच असून भूंकपच्या धक्क्यात त्याला काहीच होणार नाही. एंटीलिया होण्यापूर्वी या ठिकाणी काय होते? ही जमीन कोणाची होती?

करीमभाई इब्राहिमने यांनी बनवले होते अनाथाश्रम

एंटील‍िया असलेल्या जागा पूर्वी अनाथाश्रम होते. करीमबाई इब्राहिम यांनी १८९५ मध्ये ज्या मुलांचे आई-वडील नाहीत, त्यांच्यासाठी हे बनवले होते. खोजासमुदासाठी बनवलेले हे अनाथाश्रम चालवण्याचे काम वक्फ बोर्ड करत होते. २००२ मध्ये ट्रस्टने या जमिनीची विक्री करण्याची परवानगी मागितली. सरकारकडून त्याला परवानगी देण्यात आली.

२.५ मिलियन डॉलरमध्ये घेतली जमीन

द न्यू इंडियन एक्सप्रेसमधील र‍िपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी ही जमीन घेतली. मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया कमर्शियल प्राइव्हेट लिमिटेडने त्यासाठी २.५ मिलियन डॉलर दिले. त्यानंतर २००३ मध्ये मुंबई मनपाने या ठिकाणी इमारत बांधण्यास मंजुरी दिली. २००६ मध्ये त्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले.

एंटीलिया हे नाव कसे दिले?

एंटीलिया हे नाव स्पेनमधील एका बेटावरुन घेतले आहे. या घराचे डिझाइन अमेरिकन आर्किटेक्चर कंपनी पर्किन्स अँड विलने तयार केले आहे. या घरात ६०० कर्मचारी काम करतात. एंटिलियामध्ये तीन हेलिपॅड बांधण्यात आले आहेत. २०१० मध्ये इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंबानी परिवार २०११ मध्ये या ठिकाणी राहण्यास आले. त्यात वास्तूदोष असल्याचा संशय अंबानी परिवारास होता. त्यामुळे जून २०११ मध्ये ५० पडितांनी एंटीलिया पूजा विधी करत त्या दोषाचे निवारण केले. त्यानंतर २०११ मध्ये अंबानी कुटुंब त्या ठिकाणी राहण्यास आले.

ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.