मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी, वॉरने बफेंना मागे टाकलं

| Updated on: Jul 11, 2020 | 6:21 PM

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत (Forbes list Mukesh Ambani).

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी, वॉरने बफेंना मागे टाकलं
Follow us on

नवी दिल्ली : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत (Forbes list Mukesh Ambani). फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत ते सातव्या क्रमांकावर पोहचले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी बर्कशायर हॅथवेचे प्रमुख वॉरेन बफेट, गुगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनाही श्रीमंतांच्या यादीत मागे टाकले आहे.

फोर्ब्सने जगातील सर्वाधिक श्रीमंत 10 व्यक्तींची यादी जाहीर केली. यात आशिया खंडातून केवळ मुकेश अंबानी यांना स्थान मिळाले आहे. ते या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 70 अरब डॉलर झाली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मागील 20 दिवसांमध्ये 5.4 अरब डॉलरची संपत्ती वाढली

मागील 20 दिवसांमध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास 5.4 अरब डॉलरची वाढ झाली. या संपत्ती वाढीनंतरच ते श्रीमंतांच्या यादीत सातव्या क्रमांकवर पोहचले आहेत. काही दिवसांपूर्वीच 20 जून रोजी आलेल्या फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानींचा क्रमांक 9 होता. फोर्ब्सची यादी संबंधित उद्योगपतीच्या व्यवसायातील शेअरच्या किमतीवरुन बनवली जाते.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जेफ बेजोस याचं नाव आहे (Jeff Bezos). जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती 188.2 अरब डॉलर आहे. दुसरीकडे बिल गेट्स 110.70 अरब डॉलरच्या संपत्तीसह दूसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड ऑर्नोल्ट फॅमिली 108.8 अरब डॉलर संपत्तीसह यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्क जुकरबर्ग 90 अरब डॉलरसह यादीत चौथ्या स्थानी आहे. स्टीव बॉल्मर 74.5 अरब डॉलरसह पाचव्या आणि लॅरी एलिसन 73.4 अरब डॉलर संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानी 70.10 अरब डॉलर संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत जागतिक स्तरावर 7 व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर वॉरेन बफे, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

‘फोर्ब्स’ची सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची टॉप 100 यादी जाहीर, अव्वल कोण?

श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट एकमेव क्रिकेटर, वर्षाची कमाई तब्बल….

Mukesh Ambani seventh in forbes list