श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट एकमेव क्रिकेटर, वर्षाची कमाई तब्बल....

फोर्ब्सने 100 श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. सलग तिसऱ्या वर्षी या यादीत समावेश होणारा विराट एकमेव भारतीय खेळाडू ठरला.

श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट एकमेव क्रिकेटर, वर्षाची कमाई तब्बल....

नवी दिल्ली: फोर्ब्सने 100 श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. सलग तिसऱ्या वर्षी या यादीत समावेश होणारा विराट एकमेव भारतीय खेळाडू ठरला.

विराट कोहली 175 कोटींच्या वार्षिक उत्पन्नासह फोर्ब्सच्या यादीत 100 व्या क्रमांकावर आहे. या यादीत स्थान मिळालेला कोहली एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अर्जेंटीनाचा फुटबॉल स्टार लियोन मेसी आहे. पुर्तगालचा फुटबॉलर रोनाल्डोचा या यादीत तिसरा क्रमांक आहे.

कोहली 2017 मध्ये 141 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 89व्या स्थानी आणि 2018 मध्ये 166 कोटी रुपयांच्या उत्पन्नासह 83व्या क्रमांकावर होता. जून 2018 पासून जून 2019 पर्यंत त्याचे उत्पादन जवळपास 7 कोटींनी (10 लाख डॉलर) वाढून 173.3 कोटी रुपये झाली. यावेळी विराट 100व्या स्थानावर आहे.

विराट कोहलीचे उत्पन्न

कोहलीचे या वर्षीचे उत्पन्न 175 कोटी रुपये आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार कोहलीला जाहिरातींमधून 2.1 कोटी डॉलर, तर वेतन आणि बक्षिसांच्या रुपात 40 लाख डॉलरचे उत्पन्न मिळते. मागील 12 महिन्यांमध्ये त्याने एकूण 2.5 कोटी डॉलरची कमाई केली. मागील वर्षी 228.09 कोटींच्या उत्पन्नासह 83 व्या स्थानावर होता.

खेळाडूदेशखेळउत्पन्न (कोटी)
लियोनेल मेसीअर्जेंटीनाफुटबॉल881.72
क्रिस्टियानो रोनाल्डोपुर्तगालफुटबॉल756.35
नेमारब्राझिलफुटबॉल728.64
कनेलो अल्वारेजमेक्सिकोबॉक्सिंग652.31
रॉजर फेडररस्वित्झर्लंडटेनिस648.21
रसेल विल्सनअमेरिकाफुटबॉल621.15
एरन रॉजर्सअमेरिकाफुटबॉल619.83
लॅब्रॉन जेम्सअमेरिकाबास्केटबॉल617.74
स्टीफन करीअमेरिकाबास्केटबॉल553.89
केविन डुरंटअमेरिकाबास्केटबॉल453.94

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *