
Mukesh Ambani @100 Billion Dollar Club : गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसले. BSE Sensex मध्ये 862 अंकांची उसळी दिसली. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंटस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1.69% तेजी दिसली. या घाडमोडींमुळे कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 1.81 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1,59,23 कोटी रुपयांची तेजी दिसली. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती आता 99.6 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत 9.02 अब्ज डॉलरची तेजी दिसली. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 18 व्या क्रमांकावर कायम आहेत.
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये गुरुवारी 1.22 अब्ज डॉलरची तेजी दिसून आली. ते 92.3 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह ते जगात 20 व्या क्रमांकावर तर आशियात दुसऱ्या क्रमांकावर होते. यंदा त्यांच्या नेटवर्थमध्ये 13.6 अब्ज डॉलरची तेजी दिसली. यंदा कमाईत जगामध्ये ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत यंदा 180 अब्ज डॉलरची तेजी दिसली. जगातील टॉप-10 मध्ये 9 श्रीमंत अमेरिकेतील आहेत.
टॉप-10 मध्ये कोण कोण?
Elon Musk 448 अब्ज डॉलरसह श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. एलिसन 372 अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग 251 अब्ज डॉलरसह तिसऱ्या, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस 238 अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर, लॅरी पेज 220 अब्ज डॉलरसह पाचव्या क्रमांकावर, त्यानंतर सर्गेई ब्रिन ($206 अब्ज), बर्नार्ड आरनॉल्ट ($194 अब्ज), स्टीव्ह बालमर ($176 अब्ज), जेंसन हुआंग ($158 अब्ज) आणि मायकल डेल ($157 अब्ज) हे या टॉप-10 मधील श्रीमंत आहेत.
रिलायन्स समूहाची घोडदौड
जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकीकृत निव्वळ 695 कोटी रुपयांचा नफा कमावला. दुसऱ्या तिमाहीत 0.9 टक्क्यांची वाढ झाली. एका वर्षांपूर्वी हा आकडा 689 कोटी रुपये इतका होता. बीएसई आकडेवारीनुसार, जिओ फायनेन्शिअल लिमिटेडचा शेअर शुक्रवारी 1.11 टक्क्यांनी घसरला. दुपारी 1.28 वाजता हा शेअर 308.60 रुपयांवर होता. कालही या शेअरमध्ये घसरण झाली होती. बाजारात काल तेजीचे सत्र सुरू असतानाही जिओला सूर गवसला नव्हता. तर मुकेश अंबानींची लवकरच 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये एंट्री होणार आहे.