
नवी दिल्ली | 18 February 2024 : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमेची मानण्यात येते. पण बाजारातील एखादा शेअर मल्टिबॅगर ठरतोच. अगदी सुरुवातीला ज्यांनी असा शेअर खरेदी केला. त्यांचे नशीब एकदम उघडते. काही शेअर दीर्घकालीन फायदा मिळवून देतात तर काही शेअर अवघ्या काही दिवसांत मालामाल करतात. अशाच एका शेअरने गुंतवणूकदारांना अवघ्या पाच वर्षात लॉटरी लावली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या (Hazoor Multi Projects Share) शेअने एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, शेअरधारकांना 3 कोटींचा परतावा दिला. 5 वर्षांत 33,670 टक्क्यांचा परतावा केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले...