Multibagger Stock: पैशांच्या थैल्या आल्या घरी, 1 लाखांचे या शेअरने केले 1.1 कोटी, गुंतवणूकदारांना लॉटरी

Multibagger Stock: एकीकडे सोने-चांदीचे भाव गगनाला भिडत असताना काही ज्वेलरी स्टॉकचा मात्र उलट्या दिशेने प्रवास सुरू आहे. पण या मल्टिबॅगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना पैसा ठेवायला जागा कमी पडली आहे. एक लाख रुपयांचे आता 1.1 कोटी रुपये झाले आहेत .

Multibagger Stock: पैशांच्या थैल्या आल्या घरी, 1 लाखांचे या शेअरने केले 1.1 कोटी, गुंतवणूकदारांना लॉटरी
थंगमायिल ज्वेलर
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Jan 22, 2026 | 3:59 PM

Thangamayil Jewellery : थंगमायिल ज्वेलरीने शेअरधारकांना मालामाल केले आहे. कंपनीवर ज्यांनी विश्वास टाकत गुंतवणूक कायम ठेवली त्यांना लॉटरी लागली. थंगमायिल ज्वेलरीचा शेअर फेब्रुवारी 2010 मध्ये बाजारात सूचीबद्ध झाला. त्याने या 15 वर्षांत गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. एक लाखांच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने एक कोटी रुपयांहून अधिकचा परतावा दिला आहे. त्यामुळे ही कंपनी मल्टिबॅगर स्टॉकचं इंजिन ठरली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना शेअर बोनसचंही गिफ्ट दिलेलं आहे.

1 लाखांचे केले 1.1 कोटी

थंगमायिल ज्वेलर्सचा शेअर 19 फेब्रुवारी 2010 रोजी बाजारात सूचीबद्ध झाला. हा शेअर 70 रुपयांवर लिस्टेट झाला. त्यावेळी आयपीओनुसार, एक लाख रुपयांमध्ये गुंतवणूकदारांना 1428 शेअर मिळाले. जुलै 2023 मध्ये कंपनीने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर दिला. त्यामुळे एक लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या शेअरची संख्या वाढून 2856 वर पोहचली. थंगमयिल ज्वेलर्सचा शेअर बुधवारी 21 जानेवारी 2026 रोजी उसळून 3892.55 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे या 2856 या शेअरची एकूण किंमत वाढून 1.1 कोटींच्या घरात पोहचली. यामध्ये कंपनीने दिलेला लाभांश गृहित धरण्यात आलेला नाही.

कंपनीचा नफा दुप्पट

थंगमायिल ज्वेलरी (Thangamayil Jewellery) कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दुप्पटीपेक्षा अधिक फायदा झाला. कंपनीने डिसेंबर 2025 तिमाहीत 105 कोटींचा नफा कमावला. तर गेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता समान कालावधीत कंपनीला 48 कोटींचा नफा झाला होता. कंपनीचा महसूल चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 2406 कोटी रुपये इतका होता. तर त्यापूर्वीच्या समान कालावधीत हा महसूलाचा आकडा 1132.5 कोटी रुपये इतका होता. डिसेंबर 2025 तिमाहीत थंगमायिल ज्वेलरीचा इबिटडा 172.2 कोटी रुपये इतका होता. एक वर्षांपूर्वी याच कालावधीत कंपनीचा इबिटडा 83.3 कोटी रुपये होता. कंपनीचा इबिटडा पण चांगला आहे.

मल्टिबॅगर कंपनीचा शेअर गेल्या 6 महिन्यात 105 टक्क्यांनी उसळला. थंगमयिल ज्वेलरी शेअर 21 जुलै 2025 रोजी 1900.25 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 21 जानेवारी 2026 रोजी 3892.55 रुपयांवर बंद झाला. एका वर्षात या कंपनीचा शेअर 126 टक्क्यांनी वधारला. थंगमायिल ज्वेलरी शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 4138.15 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 1526.45 रुपये आहे. ज्यांनी या कंपनीत त्यावेळी एक लाखांची गुंतवणूक केली, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज एक कोटीहून अधिक रुपये झाले आहे. त्यामुळे Multibagger Stock: करोडपती करणारा शेअर! गरिबी दूर झाली झटक्यात, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का? त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.