AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Cash Transaction : रोखीतील व्यवहार करताना जरा जपून, थेट मिळेल टॅक्स नोटीस!

New Cash Transaction : रोखीतील व्यवहार करत असाल तर जरा जपून. धडाधड व्यवहार करताना यासंबंधीचे नियम एकदा नजरेखालून घाला. रोखीतील व्यवहार करताना इनकम टॅक्स विभागाची नोटीसही येऊ शकते.

New Cash Transaction : रोखीतील व्यवहार करताना जरा जपून, थेट मिळेल टॅक्स नोटीस!
| Updated on: Feb 11, 2023 | 8:32 PM
Share

नवी दिल्ली : आजच्या घडीला प्राप्तिकर खाते रोखीतील व्यवहारांवर (Cash Transaction) बारीक नजर ठेऊन आहे. मर्यादापलिकडे तुम्ही व्यवहार केल्यास त्याचा फटका तुम्हाला बसलाच म्हणून समजा. गेल्या काही वर्षांपासून इनकम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) लोकांच्या व्यवहारांवर लक्ष ठेऊन आहे. नियमानुसार व्यवहारांची मर्यादा ओलांडली तर तुम्हाला टॅक्स नोटीस (Tax Notice) आल्याशिवाय राहत नाही. आज गुंतवणुकीचे विविध पर्याय समोर आले आहेत. त्यात म्युच्युअल फंड, बँक, ब्रोकर आणि इतर ही अनेक पर्याय आहेत. याठिकाणी रोखीतील व्यवहारांविषयीचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूक आणि कर्ज देणाऱ्या संस्थाही एका मर्यादेपर्यंतच रोखीतील व्यवहार करतात. जर तुम्ही या नियमाचे उल्लंघन केल्यास प्राप्तिकर खाते तुम्हाला नोटीस पाठविते. त्यामुळे रोखीतील व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

तुम्ही एखाद्या बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर याविषयीचा नियम लक्षात ठेवा. मुदत ठेव योजनेत 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम गुंतवल्यास तुम्हाला प्राप्तिकर खात्याची नोटीस हमखास भेटेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याविषयीची घोषणा केलेली आहे. तुम्ही एका एफडीत अथवा सर्व एफडी मिळून ही गुंतवणुकीची रक्कम निर्धारीत मर्यादेच्या बाहेर जाता कामा नये. नाहीतर तुम्हाला टॅक्स नोटीस येईल.

अचल संपत्तीची खरेदी-विक्री करतानाही नियमाचा फटका बसू शकतो. जर एखाद्याने 30 लाख अथवा त्यापेक्षा अधिकची उलाढाल झाल्यास याविषयीचा खुलासा करावा लागेल. हा व्यवहार इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर येईल. तसेच मालमत्तेची विक्री वा खरेदी करताना नियमांचे पालन केले तर टॅक्स नोटीस मिळणार नाही.

बँकेच्या बचत खात्यात रक्कम जमा करतानाही तुम्हाला जागरुक रहावे लागेल. कुठलीही मोठी रक्कम जमा करताना पॅन कार्ड द्यावे लागते. पण एका निर्धारीत रक्कमेपेक्षा तुम्ही जास्त रक्कम जमा केल्यास तुम्हाला टॅक्स नोटीसचा सामना करावा लागेल. ही मर्यादा 10 लाखांची आहे. जर एखादा खातेदार एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करत असेल तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आल्याशिवाय राहणार नाही.

डिबेंचर, शेअर आणि बाँडसाठी ही नियम आहेत. शेअर बाजार, म्युच्युअल फंड यातील गुंतवणुकीसाठीही हा नियम लागू आहे. गुंतवणूक करताना 10 लाख रुपयांची मर्यादा लक्षात ठेवा. याविषयीची खूणगाठ बांधा. एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केल्यास तुम्हाला नोटीसचा सामना करावा लागेल .

आता शेवटचा एक महत्वपूर्ण मुद्दा ही लक्षात ठेवा. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा अधिक वापर करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सूचीत केल्याप्रमाणे, जर तुम्ही एक लाख अथवा त्यापेक्षा अधिकचे क्रेडिट कार्डचे बिल रोखीत भरत असाल तर अडचणीत याल. तुम्हाला प्राप्तिकर खात्याची नोटीस मिळू शकते. असे पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला बँकेला आणि प्राप्तिकर खात्याला सूचीत करणे आवश्यक आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.