
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी वाराणसीत पोहचल्या. त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी त्या काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या. पूजा-पाठ केले. भगवान शिव यांना लग्नाची पत्रिका अर्पण केली. त्यानंतर नीता अंबानी यांची पाऊले वाराणसीमधील प्रसिद्ध चाटच्या दुकानाकडे वळली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन टमाटर चाट आणि आलू टिक्कीचा स्वाद घेतला.
मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि सून राधिका यांचे लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी नीता अंबानी बाबा विश्वानाथ यांच्या दरबारात आल्या. त्यांनी काशी विश्वनाथ आणि गंगा मातेचे आशीर्वाद घेतले. गंगा आरतीमध्ये सहभागी घेतला. काशी विश्वनाथ धाम येथे दर्शन आणि पूजा केल्यानंतर त्या काशी चाट भंडारला पोहोचल्या.
neeta ambain
नीता अंबानी यांच्यासोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा होते. माध्यमांशी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, मी 10 वर्षांनी वाराणसीत आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरची भव्यता पाहून खूप आनंद झाला. काशी पूर्णपणे बदलली आहे.
neeta ambain
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचा मुख्य सोहळा शुक्रवारी 12 जुलैपासून सुरु होणार आहे. लग्नासाठी येणार्या पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पोशाख घालून येण्यास सांगण्यात आले आहे. रविवारी 14 जुलै रोजी लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. राधिका मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे.
Varanasi, Uttar Pradesh: Nita Ambani visits a chaat shop and interacts with locals
🎥ANI#NeetaAmbani #AnantAmbaniWedding #Varanasi #PanchayatiTimes pic.twitter.com/QnusTmBkFp
— POWER CORRIDORS (@power_corridors) June 24, 2024
अनंत आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीचा सोहळा या वर्षाच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरमध्ये झाला होता. या सोहळ्यास जगभरातील दिग्गज आले होते. बिल गेट्सपासून एलन मस्कसारखे उद्योगपतींनी त्या प्री वेडींग समारंभाला हजेरी लावली होती. तसेच हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजर होत्या. तसेच दुसरे प्री-वेडिंग समारंभ 29 मई से 1 जून दरम्यान क्रूजवर आयोजिच केले होते.