AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty With Brain, उसा उभारला 8000 कोटींचा उद्योग!

Nadia Chauhan | श्रीमंत कुटुंबातील मुलांची जास्त कष्ट करण्याच्या तयारीत नसतात, त्यांना आरामात आयुष्य घालवायला आवडतं, असा एक समज आहे. पण पारले एग्रोची मालकीण नादिया चौहान ही त्याला अपवाद आहे. तिने या सर्व ठोकताळ्यांना छेद दिला आहे. तिने कुटुंबाचा व्यवसाय 30 पटीने वाढवला आहे.

Beauty With Brain, उसा उभारला 8000 कोटींचा उद्योग!
| Updated on: Feb 15, 2024 | 10:11 AM
Share

नवी दिल्ली | 15 February 2024 : व्यवसाय करणे आणि तो यशस्वीपणे करणे यामध्ये फरक आहे. प्रत्येकाकडेच ती हातोटी नसते. तसेच त्यासाठीची कल्पकता, दृढविश्वास आणि मेहनत करण्याची तयारी लागते. पारले एग्रो कंपनीची मालकीण नादिया चौहान हिने तिच्या कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी झेप घेतली. कुटुंबाचा व्यवसाय 30 पटीने वाढवला. ब्युटी विथ ब्रेन असा किताब मिरवणाऱ्या नादियाने परदेशात शिक्षण पू्र्ण केलं आहे, नाही तिच्याकडे मोठी पदवी आहे. वडिलांच्या अनुभवाच्या बळावर 300 कोटींची कंपनीला 8000 कोटींच्या घरात पोहचवले.

20 वर्षात घेतली झेप

नादिया 2003 मध्ये वडील प्रकाश चौहान यांच्या पारले एग्रो कंपनीत रुजू झाली. त्यावेळी कंपनीची उलाढाल 300 कोटी रुपये इतका होता. 2017 पर्यंत य कंपनीचा महसूल 4,200 कोटी रुपयांच्या घरात पोहचला. तर 2022-23 मध्ये या कंपनीने 8,000 कोटींचा महसूल मिळवला. कंपनीच्या या घौडदौडीत नादियाचा सिंहाचा वाटा आहे. 37 वर्षीय नादिया सध्या कंपनीची चिफ मार्केटिंग ऑफिसर आणि संयुक्त संचालक आहे. तिची मोठी बहिण शाऊना चौहान कंपनीची सीईओ आहे.

नादियाच्या जन्मावेळी कंपनीची स्थापना

पारले एग्रो कंपनीची सुरुवात वर्ष 1985 मध्ये झाली होती. तेव्हा नादियाचा जन्म झाला होता. तेव्हा तिचे वडील प्रकाश चौहान हे स्वीडिश कंपनीच्या आंब्याच्या उत्पादनासाठी टेट्रा पॅक तयार करत होते. नादियाने पदवी मिळवल्यानंतर 17 व्या वर्षीच कंपनी ज्वाईन केली. तेव्हा कंपनीची 95 टक्के कमाई केवळ फ्रुटी या उत्पादनापासून होत होती.

2005 मध्ये नवीन प्रोडक्ट

नादियाने त्यांचे लक्ष इतर उत्पादनांकडे वळवले. 2005 मध्ये एपी फिज (Appy Fizz) हे उत्पादन बजारात उतरविण्यात आलं. ते लवकरच लोकप्रिय झालं. त्यानंतर तिने इतर अनेक उत्पादनं बाजारात आणले. त्यामध्ये लिंबू पाणी हे पण एक उत्पादन आहे. त्यानंतर बहिणीसोबत तिने मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु केले. कंपनीचे बाटलीबंद पिण्याचे पाणी बैले (Bailey) पण लोकप्रिय ठरले. या उत्पादनाच्या माध्यमातून कंपनीने 1,000 कोटींच्या व्यवसायाची उभारणी केली. 2030 पर्यंत कंपनीचा महसूल 20 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे नादियाचे लक्ष आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.