आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम

| Updated on: Jan 24, 2021 | 9:46 AM

पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे, त्यावेळी 86 टक्के चलनं अचानक चलनबाह्य झाली होती. यानुसारत आताही रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता 10 आणि 100च्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात येणार आहे.

आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा हा नियम
Follow us on

नवी दिल्ली : तब्बल चार वर्षांआधी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली होती. रात्री आठ वाजता केलेल्या या घोषणेमध्ये रात्री 12 वाजेपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या. साध्या शब्दात सांगायचं तर, 9 नोव्हेंबर 2016 पासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांना फक्त कागदाची किंमत राहिली होती. पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे, त्यावेळी 86 टक्के चलनं अचानक चलनबाह्य झाली होती. यानुसारत आताही रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता 10 आणि 100च्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात येणार आहे. (no old 100 10 and 5 rupees notes will withdraw said by rbi here know how to exchange it)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किंवा एप्रिल 2021 पर्यंत व्यवहारातून बाद केल्या जातील असं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या जुन्या नोटांची मालिका मागे घेण्याच्या योजनेवर आरबीआय सध्या काम करत आहे. पण नोटा बाद करण्याआधी 100, 10 आणि 5 च्या नवीन नोटा बाजारात आणल्या जातील अशीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या नोटांवर बंदी नसून बाजारात नव्या नोटा आल्या की जुन्या नोटा बाद होतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. खरं तर नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे म्हणणे आहे. दहा रुपयांच्या नाण्यांविषयी वेगवेगळा अफवा पसरविल्या जातात.

अनेक व्यापारी किंवा दुकानदार त्यांना घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयचे म्हणणे आहे की, ही बँकेसाठी अडचण आहे, म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफव्यांवर लक्ष देऊ नये. (no old 100 10 and 5 rupees notes will withdraw said by rbi here know how to exchange it)

संबंधित बातम्या – 

‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा

Special Story : पैशाला पैसा जोडून बक्कळ कमवाल, गुंतवणुकीआधी लक्षात असूद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती

(no old 100 10 and 5 rupees notes will withdraw said by rbi here know how to exchange it)