आता 'छोटा भीम'सोबत तुमचा बिझनेस सुरु करा

मुंबई : लहान मुलांमध्ये सध्या छोटा भीम कार्टुनची खूप क्रेझ आहे. तसेच छोटा भीम संबधातील प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यासाठी लहान मुलं नेहमी आग्रही असतात किंवा आपल्या पालकांकडे हट्ट करुन ती गोष्ट मिळवतात. अशातच ग्रीन गोल्ड कंपनी आपल्यासाठी फ्रॅन्चाईजीची सुवर्णसंधी घेऊन आली आहे. ही कंपनी लहान मुलांसाठी अनेक वेगवेगळे खेळण्याच्या वस्तू तयार करते. ग्रीन गोल्ड स्टोअरमध्ये …

आता 'छोटा भीम'सोबत तुमचा बिझनेस सुरु करा

मुंबई : लहान मुलांमध्ये सध्या छोटा भीम कार्टुनची खूप क्रेझ आहे. तसेच छोटा भीम संबधातील प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यासाठी लहान मुलं नेहमी आग्रही असतात किंवा आपल्या पालकांकडे हट्ट करुन ती गोष्ट मिळवतात. अशातच ग्रीन गोल्ड कंपनी आपल्यासाठी फ्रॅन्चाईजीची सुवर्णसंधी घेऊन आली आहे. ही कंपनी लहान मुलांसाठी अनेक वेगवेगळे खेळण्याच्या वस्तू तयार करते. ग्रीन गोल्ड स्टोअरमध्ये छोटा भीम कार्टून टॉय, गेम्स आणि इतर प्रोडक्टला एक छताखाली विकण्याचे काम ग्रीन गोल्ड स्टोअर करत आहे. चला तर मग जाणून घेऊ फ्रॅन्चाईजी घेण्यासाठी काय करावे लागेल…..

छोटा भीम संबधित वस्तूंच्या विक्रीसाठी संपूर्ण भारतात कोणत्याही शहरात हे स्टोअर सुरु करु शकतात. तीन श्रीणींच्या शहरांमध्ये वेग वेगळी फी आकरली जाणार आहे.

गुंतवणूक

गुंतवणुकीसाठी तीन श्रेणींच्या शहरामध्ये वेगवेगळं शुल्क आकरलं जाणार आहेत. यामध्ये फ्रॅन्चाईजी सेटअप, इंटीरियर डिझाईनिंग, मार्केटिंग, इंफ्रास्ट्रक्चर, स्टोअर सेटअप आणि लाँचिंग यांचा समावेश आहे.

  • टिअर वन शहरासाठी 14 लाख,
  • टिअर टू शहरासाठी 12 लाख,
  • टिअर थ्री शहरासाठी 8 लाख रुपये

फ्रॅन्जाईजीसाठी लागणारी गरज

तुमच्याकडे कमीतकमी 300 स्केअर फूट जागा पाहिजे. ही जागा मार्केट किंवा शॉपिंग एरियामध्ये असावी. तसेच जागा मोठी असावी. स्टोअर मालकीचे किंवा भाडेतत्वावर असावे.

ग्रीन गोल्ड स्टोअर्स देणार सपोर्ट

स्टोअरचा लेआऊट आणि डिझाईनिंगची जबाबदारी कंपनी सांभाळेल. छोटा भीम कार्टुन संबधित वस्तूंसोबत मार्केटिंग किंवा लाँचिंग केली कंपनीकडून केली जाईल. तसेच ट्रेनिंग आणि बिलिंग सॉफ्टवेअरही दिला जाईल. प्रमोशन आणि स्कीमसाठी सुद्धा कंपनी मदत करणार आहे.

ग्रीन गोल्ड स्टोअरसोबत काम करायचं असल्यास, तुम्हाला या वेबसाईटवर सर्व माहिती मिळेल.

किती होणार फायदा?

फ्रॅन्चाईजी इंडियाच्या माहितीनुसार, फ्रॅन्चाईजी घेणाऱ्यांना 40 टक्के मार्जिन दिली जाईल. तसेच गुंतवणुकीवर 24 टक्के रिटर्न मिळण्याचा अंदाज आहे. जर तुम्ही फ्रॅन्चाईजी घेत असाल तर तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दोन वर्षात पूर्ण होईल. फ्रॅन्चाईजी तीन वर्षासाठी ऑफर केली जाते. तसेच तुम्ही याला तीन वर्षापर्यंत रिन्यू करु शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *