October Rule Change : 1 ऑक्टोबरपासून महत्त्वाच्या नियमांत बदल, जाणून घ्या अन्यथा बसेल मोठा फटका!

एक ऑक्टोबरपासून अनेक नियमांत बदल होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी आर्थिक फटकादेखील बसू शकतो. त्यामुळे हे बदललेले नियम काय आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

October Rule Change : 1 ऑक्टोबरपासून महत्त्वाच्या नियमांत बदल, जाणून घ्या अन्यथा बसेल मोठा फटका!
1 october new rule
| Updated on: Sep 30, 2025 | 7:52 PM

October Rule Change : सप्टेंबर महिना संपला आहे. आता ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. नवा महिना चालू झाला की अनेकांना आर्थिक व्यवहार तसेच इतर कामाचे नियोजन करावे लागते. हे नियोजन करताना काही गबड झाली की संपूर्ण महिन्याचा ताळेबंद बिघडण्याची शक्यता असते. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याचे नियोजन करताना तुम्हाला सरकारच्या बदललेल्या नियमांची कल्पना असणे गरजेचे आहे. या नव्या नियमांची तुम्हाला माहिती नसेल तर ऐनवेळी मोठे संकट उभे राहू शकते. कदाचित तुमचे आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबपासून नेमके कोण-कोणते नियम बदलले आहेत. तसेच या नियमांचा तुमच्यावर काय परिणाम पडणार आहे? हे जाणून घ्या…

1) येत्या 1 ऑक्टोबरपासून PPF, SCSS, SSY तसेच पोस्ट ऑफिसच्या सर्व स्मॉल सेव्हिंग योजनांच्या व्याजदरात बदल होऊ शकते. हा व्याजदर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलत असतो.

2) एक ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरचा दर बदलू शकतो. त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

3) येत्या 1 ऑक्टोबरपासून रेल्वेचे तिकीट बुक करण्याबाबतही मोठा बदल लागू होणरा आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना आधार व्हेरिफाय असणे गरजेचे आहे. रिझर्व्हेशनची प्रक्रिया चालू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत आधार व्हेरिफाय असणाऱ्या लोकांनाच तिकीट बुक करता येईल. PRS काऊंटवरून तिकीट बुक करणाऱ्यांसाठी अगोदरचीच प्रक्रिया लागू असेल.

4) येत्या 1 ऑक्टोबरपासून यूपीआय फिचरमध्येही बदल केले जाणार आहेत. आता सिलेक्ट रिक्वेस्ट आणि पुल ट्रान्जेक्शन हे फिचर बंद होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून यूपीआयच्या मदतीने पाच लाखांपर्यंची रक्कम एकाच वेळी पाठवणे शक्य होणार आहे.

5) एक ऑक्टोबरपासून एनपीएस योजनेतही मोठा बदल होणार आहे. आता एनपीएस योजनेतील किमान योगदान 1000 रुपये करण्यात आले आहे.

6) एक ऑक्टोबरपासून पेन्शन स्किमच्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत. NPS, अटल पेन्शन योजना NPS Lite या योजनांचे नियम बदलतील.

7) आता एनपीएस योजनेत गुंतवणूक करणाऱ्या बिगर सरकारी व्यक्तीला त्याच्या एनपीएस खात्यातील 100 टक्के पैसे शेअर बाजारात लावता येणार आहेत. एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन गेमिंगसाठी नवे नियम लागू होतील. सर्व गेमिंग प्लॅटफॉर्म्सना आता MeitY कडून परवाना घ्यावा लागणार आहे.

8) पोस्ट ऑफिसच्या सेवाशुल्कांमध्येही बदल करण्यात आला आहे. हा बदल येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. पोस्ट विभागाने स्पीडपोस्ट आणि ऑनलाईन बुकिंगच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमांत ओटीपीवर आधारलेली डिलिव्हरी, रियल टाईम ट्रॅकिंग सुविधादिली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना काही सुट देण्यात आली.