Gold Rate : आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण, राज्यातील प्रमुख शहरात आजचे भाव काय?

| Updated on: Nov 25, 2022 | 4:34 PM

Gold Rate : सोने प्रत्येक दिवशी किंमतीचा नवीन उच्चांक गाठत असले तरी आठवड्याभरात त्यात किंचित घसरण झाली आहे.

Gold Rate : आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण, राज्यातील प्रमुख शहरात आजचे भाव काय?
सोने-चांदीचे दर काय
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोने-चांदीचे दर जाहीर झाले. ताज्या दरांवर नजर टाकली तर सोन्याच्या दरात (Gold Rate)  तेजी कायम दिसते, तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) किंचित घसरण दिसून येते. https://ibjarates.com/ या अधिकृत संकेतस्थळानुसार, सोन्याच्या किंमतीत तेजी कायम आहे. तर चांदीच्या किंमतीत किंचत घसरण दिसून येते. पण आठवड्याभरातील किंमतींचा विचार केला तर बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत किंचित घसरण झाल्याचे दिसून येते.

999 शुद्धतेच्या सोन्याने 52,000 रुपयांचा टप्पा पार केला असून 999 शुद्धतेची चांदी किलोमागे 62,000 रुपयांच्या पुढे आहे. सोन्याचे भाव 56,000 रुपयांच्या पुढे जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

ibjartes.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोन्याचा दर शुक्रवारी 52,729 रुपये होता. तर 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,518 रुपये, 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,300 रुपये, 750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 39,547 रुपये होता.

हे सुद्धा वाचा

तर 585 शुद्ध सोन्याचा दर 30,847 रुपये झाला. सोन्याचे दरात पूर्वीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. सोन्याची वाटचाल 56 हजारांकडे सुरु आहे. 999 शुद्ध एक किलो चांदीचा दर घसरुन 62,266 रुपये झाला.

https://www.goodreturns.in/या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,550 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,970 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,550 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,970 रुपये आहे.

नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,550 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,970 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,580 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 53,020 रुपये आहे.

चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 622 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं.

इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.