कंपनीच्या एका डीलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, थरमॅक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात 15 टक्क्यांची वाढ

| Updated on: Apr 14, 2022 | 11:45 AM

थरमॅक्स लिमिटेडच्या (Thermax Ltd) शेअरमध्ये (Stock) बुधवारी मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. कंपनीचा शेअर 14.33 टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर बंद झाला. राजस्थानमधील ग्राउंड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल (Petrochemical) कॉम्प्लेक्ससाठी युलिटलिटी बॉयलर आणि इतर सिस्टमसाठी कंपनीला 522 कोटी रुपयांची ऑडर मिळाल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली होती.

कंपनीच्या एका डीलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, थरमॅक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात 15 टक्क्यांची वाढ
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपये
Image Credit source: Tv9
Follow us on

थरमॅक्स लिमिटेडच्या (Thermax Ltd) शेअरमध्ये (Stock)  बुधवारी मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. कंपनीचा शेअर 14.33 टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर बंद झाला. राजस्थानमधील ग्राउंड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल (Petrochemical) कॉम्प्लेक्ससाठी युलिटलिटी बॉयलर आणि इतर सिस्टमसाठी कंपनीला 522 कोटी रुपयांची ऑडर मिळाल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. कंपनीने या ऑडरची माहिती देताच कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी आल्याचे पहायला मिळाले. कंपनीचे शेअर्स 14.33 टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर पोहोचले. या डीलचा कंपनीला मोठा फायदा होताना दिसून येत आहे. आणखी काही दिवस या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी राहू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑर्डरमध्ये 260 टीपीएच हाय प्रेशर युटिलिटी बॉयलरच्या दोन युनिट्सचा समावेश आहे.

कंपनीने नेमंक काय म्हटंल

थरमॅक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त वाढ दिसून आली. यामागे कारण देखील तसेच होते. कंपनीने आपल्या एका डीलबद्दल माहिती दिली. या माहितीनंतर अचानक कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली. कंपनीचे शेअर्स चौदा टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर पोहोचले. आपल्या डीलबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की राजस्थानमधील ग्राउंड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी युलिटलिटी बॉयलर आणि इतस सिस्टमसाठी कंपनीला 522 कोटी रुपयांची ऑडर मीळाली आहे. या ऑडरची माहिती मिळताच कंपनीच्या शेअर्सने उसळी
घेतली.

शेअर मार्केटमध्ये मात्र पडझड

एकीकडे थरमॅक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये वाढ झाली, मात्र दुसरीकडे बुधवार देखील शेअर मार्केटमध्ये पडझड सुरूच राहिली. सलग तिसऱ्या तिवशी सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. बुधवारी शेअर मार्केट सुरू झाले तेव्हा, सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून येत होती. मात्र दिवसाखेर पुन्हा एकदा शेअर मार्केट कोसळले. सेंसेक्स 650 हून अधिस अंकाच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टीला देखील मोठा फटका बसला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

संबंधित बातम्या

Crypto Credit Card : जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात; बिनव्याजी करा वापर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटते राज्यात सर्वाधिक दारू विक्री, गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड तोडला; तरीही महसुलात घट

आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये