Crypto Credit Card : जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात; बिनव्याजी करा वापर

ज्या ग्राहकांचा लोन-टू-व्हॅल्यू रेशो 20 टक्के अथवा त्यापेक्षा कमी असेल त्यांना या क्रेडिट कार्डवर शुन्य व्याज लागेल. मास्टरकार्ड नुसार, सध्याचे युग हे डिजिटल चलनाचे आहे. त्यामुळे क्रिप्टो क्रेडिट कार्डचे संकल्पना नाकारण्यात येऊ शकत नाही.

Crypto Credit Card : जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात; बिनव्याजी करा वापर
Cryptocurrency
Image Credit source: TV9
अजय देशपांडे

|

Apr 14, 2022 | 10:18 AM

वैधतेवरुन वादंग माजलेले असतानाच, कोणत्याही देशाच्या चलन नियमांना ठेंगा दाखविणा-या क्रिप्टोकरन्सीने (Crypto Currency) आणखी एक क्रांतीकार पाऊल टाकले आहे. क्रिप्टो करन्सीचे क्रेडिट कार्ड बाजारात दाखल झाले आहे. प्रचलनात असलेले क्रेडिट कार्ड हे सर्वसामान्य चलनावर व्यवहारास मदत करते. तर क्रिप्टोचे क्रेडिट कार्ड (Crypto Credit Card) क्रिप्टो करन्सीवर चालते. बिटकॉईन, इथिरियम या सारख्या अभासी चलनाद्वारे याचे व्यवहार पूर्ण होतील. क्रिप्टो करन्सीवर काम करणारी कंपनी नेक्सो ने क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात दाखल केले आहे. जगातील या पहिल्या क्रिप्टो क्रेडिट कार्डसाठी कंपनीने मास्टरकार्ड (MasterCard) सोबत हातमिळवणी केली आहे. क्रिप्टोची व्यवहार्यता सर्वसामान्य बाजारात शुन्य आहे. मात्र अभासी जगतात हे चलन धुमाकूळ घालत आहे, त्याचाचा फायदा घेण्यासाठी क्रेडिट कार्ड सुरु करण्यात आले आहे. रायटर्स या जागतिक वृत्तसंस्थेने क्रिप्टो करन्सीविषयी माहिती दिली आहे. नेक्सो आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्यामुळे क्रिप्टो आणि आर्थिक नेटवर्क एकत्रितरित्या काम करतील. या सहकार्य करारामुळे डिजिटल चलनाचे व्यवहार गतीने होतील अशी आशा आहे.

कसे असेल क्रिप्टो क्रेडिट कार्ड

सध्या क्रिप्टो क्रेडिट कार्ड युरोपातील काही देशांमध्येच उपलब्ध असेल. हे कार्ड वापरकर्त्यांना क्रिप्टो करन्सी न विकताच खरेदी-विक्री व्यवहार करण्याची सुविधा देते. बिटकॉईन वा अन्य अभासी चलन या क्रेडिट कार्डची हमी म्हणून उपयोगात येईल. म्हणजे अभासी चलनाची हमी दिल्यास क्रेडिट कार्ड उपयोगात येईल. अनेक क्रेडिट कार्ड असुरक्षित असतात आणि त्यांची पतमर्यादा ठरलेली असते. अशीच परिस्थितीत क्रिप्टो क्रेडिट कार्डविषयी असेल.

असे करेल काम

क्रिप्टो क्रेडिट कार्ड नेक्सो या कंपनीच्या क्रिप्टोसह जोडलेल्या पत मानांकनावर काम करेल. या मध्ये जगातील 920 लाख व्यापारी केंद्रांवर खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण होऊ शकतील. या व्यापा-यांसोबत मास्टरकार्डची भागीदारी आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना क्रिप्टो कार्डचा वापर करणे सुलभ आणि सोपे होईल. अहवालानुसार, क्रिप्टो क्रेडिट कार्डची पत मर्यादा एक लाख रुपये असेल तर त्यावर 90 टक्के म्हणजे 90 हजारांची खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण होऊ शकतील. सध्या हे कार्ड युरोपमध्ये चलनात येणार असल्याने तिथल्या चलनातच याचे व्यवहार पूर्ण होतील. या कार्डसाठी कमीतकमी खर्च मर्यादा, मासिक शुल्क तसेच इतर जाचक अटी नाहीत. या कार्डवर खर्च करण्याची आणि रक्कम काढण्याला प्रतिबंध नाही. कार्डचे जेवढे क्रेडिट वापरात येईल. तेवढ्यावरच ग्राहकाला व्याज द्यावे लागेल. ज्या ग्राहकांचा लोन-टू-व्हॅल्यू रेशो 20 टक्के अथवा त्यापेक्षा कमी असेल त्यांना या क्रेडिट कार्डवर शुन्य व्याज लागेल. मास्टरकार्ड नुसार, सध्याचे युग हे डिजिटल चलनाचे आहे. त्यामुळे क्रिप्टो क्रेडिट कार्डचे संकल्पना नाकारण्यात येऊ शकत नाही.

संबंधित बातम्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटते राज्यात सर्वाधिक दारू विक्री, गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड तोडला; तरीही महसुलात घट

आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये

केंद्र सरकारचा कापड उद्योगाला मोठा दिलासा; कापसाच्या आयातीवरील कस्टम ड्यूटी माफ करण्याचा निर्णय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें