Asim Munir Net Worth : भारताकडून सपाटून खाल्ला मार; असीम मुनीरची संपत्ती किती? या बाबतीत मुकेश अंबानींना टाकले मागे

Asim munir mukesh ambani : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून सपाटून मार खाल्ल्याने पाकड्यांचा लष्करप्रमुख असीम मुनीरचा तिळपापड झाला आहे. आता त्यांना अमेरिकेच्या पंखाखाली जाण्याची घाई झाली आहे. मुनीरची संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Asim Munir Net Worth : भारताकडून सपाटून खाल्ला मार; असीम मुनीरची संपत्ती किती? या बाबतीत मुकेश अंबानींना टाकले मागे
असीम मुनीर संपत्ती
| Updated on: Aug 14, 2025 | 9:39 AM

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. त्यानंतर आता पाक अमेरिकेच्या पंखाखाली जाण्यासाठी धडपड करत आहे. असीम मुनीर पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. असीम आणि पाकचे पंतप्रधान शरीफ सध्या अणु हल्ल्याची, क्षेपणास्त्र डागण्याच्या बेडूक उड्या मारत आहे. भारताला जेरीस आणण्यासाठी अमेरिकेने पाकवर कमी टॅरिफ लावले आहे. त्यामुळे दोघांनाही आकाश ठेंगणे झाले आहे. पाकिस्तानी कटोरा घेऊन भीक मागत आहे, पण असीम ची संपत्ती सातत्याने वाढत आहे. त्याने या बाबतीत तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांना सुद्धा मागे टाकले आहे.

कंपन्यांच्या माध्यमातून लष्कराची कमाई

पाकिस्तानी लष्कराच्या अख्त्यारीत अनेक कंपन्या चालवल्या जातात. एका अहवालानुसार, 100 हून अधिक कंपन्यांची मालकी लष्करातील विविध अधिकाऱ्यांकडे आहे. या कंपन्या तुफान नफा कमावतात. त्याचा सैन्याला भरपूर फायदा होतो. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला आयती बिदागी मिळते. या कंपन्यांच्या जोरावर लष्कर प्रमुखाला वार्षिक मोठी कमाई होते. लष्कर प्रमुख हे पद जणू सीईओ पदासारखं आहे. याचा अर्थ पाकिस्तानी लष्कर चालवत असलेल्या 100 कंपन्यांचे सीईओ हे असीम मुनीर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे पण इतक्या कंपन्यांचे सीईओ नाहीत

रिअल इस्टेटमध्ये पण दबदबा

पाकिस्तानी लष्कर हे केवळ कवायती करत नाही. तर एक मोठी व्यावसायिक टीम आहे. लष्कराचा प्रभाव संरक्षण क्षेत्रापुरता नाही. बांधकाम क्षेत्रातही लष्कराचे मोठे वर्चस्व आहे. लष्कर अनेक मोठ्या संस्था चालवते. फौजी फाऊंडेशन, आर्मी वेलफेअर ट्रस्ट, शाहीन फाऊंडेशन, बहरिया फाऊंडेशन इत्यादींचा या व्यवसायात समावेश आहे. या कल्याणकारी संस्थांच्या मागून एक मोठे व्यावसायिक जाळे लष्कराने विणले आहे.

मुनीर यांची संपत्ती किती?

जनरल असीम मुनीर यांच्या संपत्तीची सारखी चर्चा होते. मुनीर याची एकूण संपत्ती ही 80000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी असल्याचे सांगितले जाते. पण ही एक धुळफेक असून मुनीर याची संपत्ती त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचा दावा करण्यात येतो. पाकिस्तानी लष्कर प्रमुख पद हे काही केवळ गणवेश आणि बंदुकीपुरते मर्यादीत नाही तर मोठी संपत्ती कमावण्याची ती चाबी असल्याचे बोलले जाते.