AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 हजार कोटींचं साम्राज्य, बाबा रामदेव यांना मानलं, सगळ्यांनाच शीर्षासन घालायला लावलं, FMCG मध्ये आता फक्त एकच कंपनी पतंजलीच्या पुढे

कधी काळी ज्या सन्यास्याच्या भगव्या वस्त्रांची खिल्ली उडवली जायची, आज त्याच सन्यास्याने जगातील मोठ्या FMCG कंपन्यांची झोप उडवली आहे.कॉर्पोरेट विश्वाला वाटलेलं की, एका सन्यास्याला व्यापारातील बारकावे काय समजणार?.

50 हजार कोटींचं साम्राज्य, बाबा रामदेव यांना मानलं, सगळ्यांनाच शीर्षासन घालायला लावलं, FMCG मध्ये आता फक्त एकच कंपनी पतंजलीच्या पुढे
baba ramdev
| Updated on: Mar 24, 2026 | 11:10 AM
Share

TV9 भारतवर्षचं सत्ता सम्मेलन आज 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आलं आहे. यात बाबा रामदेव सहभागी झाले आहेत. ‘सत्ता सम्मेलन’ मध्ये योग गुरु बाबा रामदेव एका वेगळ्याच अंदाजात दिसले. स्वदेशी व्यापार आणि योगावरच फक्त ते बोलले नाहीत, तर जागतिक राजकारणावरही त्यांनी बिनधास्त टिप्पण्या केल्या. कधी काळी ज्या सन्यास्याच्या भगव्या वस्त्रांची खिल्ली उडवली जायची, आज त्याच सन्यास्याने जगातील मोठ्या FMCG कंपन्यांची झोप उडवली आहे. एका दशकापूर्वीची गोष्ट आहे. रामदेव यांनी मोठ्या ग्राहक बाजारपेठेत पाऊल ठेवलं. त्यावेळी कॉर्पोरेट विश्वाला वाटलेलं की, एका सन्यास्याला व्यापारातील बारकावे काय समजणार?.

मंचावर जुन्या दिवसांच्या आठवणींबद्दल बोलताना रामदेव म्हणाले की, “लोक त्यावेळी माझ्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करायचे. पण आज आकडेच सर्व काही सांगतायत” “पंतजलीने बाजारात अनेक स्थापित आणि परदेशी ब्रांड्सना मागे टाकलय. वर्तमानात ‘हिंदुस्तान यूनिलीवर’वगळता एकही कंपनी एफएमसीजी सेक्टरमध्ये पतंजलीच्या पुढे नाहीय. अन्य सर्वांना शीर्षासन घालायला लावलं” असं बाबा रामदेव म्हणाले. पतंजलीला जगातील सर्वात मोठा ब्रँड बनवणं हे त्यांचं पुढचं लक्ष्य आहे.

रशिया बाबत बाबा रामदेव काय म्हणाले?

पतंजलीचा विस्तारा आता देशाच्या सीमा ओलांडून पुढे गेलाय. रशिया सोबत झालेल्या व्यापारी करारावर बोलताना रामदेव म्हणाले की, “भारताच्या उत्पादनांसह भविष्यात भारतीय सिद्धांताना सुद्धा परदेशात मोठी मागणी आहे. रशियात आता योग आणि पतंजलीची उत्पादने मोठ्या प्रमाणात पोहोचतायत” भारत सगळ्या जगाकडे फक्त नफा कमावणारा बाजार म्हणून नाही तर एका कुटुंब म्हणून पाहतो ही महत्वाची गोष्ट ते बोलले. जागतिक स्तरावर लोक आता नैसर्गिक चिकित्सा आणि योगाचा वेगाने स्वीकार करतायत. भारताचं अध्यात्मिक, कृषी आणि चिकित्सा दर्शन सगळ्या जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे.

एक पैशाचाही खासगी शेअर किंवा मालकी हक्क नाहीय

जेव्हा कुठली कंपनी 50 हजार कोटीचा आकडा गाठते, तेव्हा मालकाच्या खासगी संपत्तीचा अंदाज लावणं स्वाभाविक आहे. रामदेव यांनी स्पष्ट केलं की, “या विशाल व्यापारिक साम्राज्यात त्यांचा एक पैशाचाही खासगी शेअर किंवा मालकी हक्क नाहीय. पतंजलीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक पैसही ते स्वत:कडे ठेवत नाहीत. सर्व हिस्सेदारी नॉन-प्रॉफिट ट्रस्टकडे आहे. जो काही पैसा मिळतो तो थेट समाजसेवा, मानवता, सनातन धर्म आणि भारत मातेच्या सेवेसाठी वापरला जातो. व्यापाराचं हे एक वेगळं मॉडेल आहे”

Follow Us
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान