
देसी एफएमसीजी कंपनी पतंजली फूड्सच्या रेव्हेन्यू आणि प्रॉफिटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच बाबा रामदेवची कंपनी जगातील मोठमोठ्या एफएमसीजी कंपन्यांना टक्कर देत आहे. चौथ्या तिमाहीचे आकडे पाहिले तर कंपनीच्या प्रॉफिटमध्ये 74 टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येईल. तर कंपनीच्या महसूलातही वाढ झालेली पाहायला मिळेल. विशेष म्हणजे कंपनीने केवळ चौथ्या तिमाहीचे आकडे जारी केले नाही, तर संपूर्ण आर्थिक वर्षाचा ताळेबंदही समोर मांडला आहे. त्यात कंपनीला फायदा झाल्याचं दिसत आहे. यात कंपनीच्या शेअरमध्ये आधी दीड टक्क्याची वाढ पाहायला मिळाली. पतंजली फूड्सने जारी केलेले आकडे कसे आहेत यावर प्रकाश टाकू.
पतंजली फूड्स लिमिटेडच्या गेल्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्चमधील तिमाहीत एकल आधारे शुद्ध लाभ 74 टक्के वाढीसह 358.53 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात 2023-24च्या समान तिमाहीत कंपनीचा शुद्ध लाभ 206.31 कोटी रुपये झाला आहे. पतंजली फूड्स लिमिटेडने गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेत सांगितले की, एकूण मिळकत चौथ्या तिमाहीत 9,744.73 करोड रुपये राहिली. ती 2023-24 च्या समान तिमाहीत 8,348.02 करोड रुपये होती.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2024-25 कडे पाहिले तर कंपनीच्या नफ्यात जोरदार वाढ झाली आहे. आकड्यातच सांगायचं झालं तर कंपनीचा शुद्ध लाभ वाढून 1,301.34 कोटी रुपये झाला आहे. तो आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 765.15 कोटी रुपये होता. रेव्हेन्यूबाबत सांगायचं झालं तर आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये कंपनीची एकूण मिळकत 34,289.40 कोटी रुपये होती. ती आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 31,961.62 कोटी रुपये होती.
गुरुवारी शेअर बाजारात पतंजली शेअरमध्ये वाढ होताना दिसली. आकडे पाहिले तर, कंपनीचा शेअर 1.41 टक्के म्हणजे 25.20 रुपये प्रति शेअर वेगाने 1811.35 रुपयांवर बंद झाला. तर कंपनीचा शेअर 1824 रुपयाने दिवसभराच्या उच्चतम स्तरावर होता. तसं पाहता कंपनीचा शेअर 1795.95 रुपयांवर ओपन झाला होता. पतंजली फूड्सच्या शेअरचा 52 आठवड्यातील हाय 2,030 एवढा आहे. 4 सप्टेंबर 2024मध्ये या लेव्हलला शेअर होता. सध्या कंपनीची व्हॅल्यूएशन 65,603.03 कोटी आहे.