हाय कोलेस्ट्रोलची समस्या झटक्यात दूर होईल, पतंजलीचे हे औषध खायला सुरुवात करा; रिसर्चमध्ये दावा
पतंजलीने केलेल्या संशोधनानुसार, पाच आयुर्वेदिक औषधांचे संयोजन रक्तातील आणि धमन्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात प्रभावी आहे. या औषधांमध्ये दिव्य सर्वकल्प क्वाथ, दिव्य अर्जुन क्वाथ, पतंजली सी बकथॉर्न कॅप्सूल, दिव्य लिपिडोम टॅबलेट आणि दिव्य लौकी घनवटी टॅबलेटचा समावेश आहे.

रक्तात कोलेस्ट्रोल वाढल्याने त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होतो. हार्ट अटॅकचाही धोका असतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने रुग्ण त्यावर उपचार करण्यासाठी धडपडत असतो. पण वारंवार औधधे घेतल्याने नंतर त्याच्या रक्तातून कोलेस्ट्रोल कमी होतो. पण धमन्यांमध्ये जमा जालेला कोलेस्ट्रोल निघत नाही. त्यामुळे तुम्ही आयुर्वेदाचा आसरा घेता. पतंजलीने रिसर्चनंतर केलेल्या दाव्यानुसार, आयुर्वेदिक औषधे कोलेस्ट्रोल आणि ट्राईग्लेसाईडला कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. त्याचा काही साईड इफेक्टही होत नाही.
पतंजलीकडून पाच औषधांचं एक कॉम्बिनेशन तयार करण्यात आलं आहे. या औषधांनी केवळ ब्लडमधील कोलेस्ट्रोल आणि ट्रायग्लेसाईड कमी होणार नाही तर धमन्यांमधील गोठलेलंही निघून जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधे घेतल्याने कोलेस्ट्रोल संबंधित आजार होणार नाही. सांगितलेल्या पद्धतीनुसार महिनाभर औषध घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येईल. रुग्णाच्या स्थितीनुसार औषधे घेण्याची वेळ कमी अधिक होऊ शकते, असंही सांगण्यात आलं.
आयुर्वेदिक औषधे
पतंजलीच्या संशोधनात दावा करण्यात आला आहे की, आयुर्वेदातील या औषधी कोलेस्ट्रॉल आणि त्यासंबंधित आजारांपासून मुक्ती देतात. या औषधांमध्ये दिव्य सर्वकल्प क्वाथ, दिव्य अर्जुन क्वाथ, पतंजली सी बकथॉर्न कॅप्सूल, दिव्य लिपिडोम टॅबलेट, दिव्य लौकी घनवटी टॅबलेट यांचा समावेश आहे. या औषधी एक महिना ठरलेल्या पद्धतीने घेणे आवश्यक आहे. संशोधनात दावा करण्यात आला आहे की या औषधी नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉलची समस्या मुळापासून दूर होते. केवळ रक्तातील कोलेस्ट्रॉलच कमी होत नाही, तर धमन्यांमध्ये जमा झालेला कोलेस्ट्रॉल देखील बाहेर निघून जातो. त्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता जवळपास संपते.
औषधे घेण्याची पद्धत
संशोधनात सांगितले आहे की. दिव्य सर्वकल्प क्वाथ आणि दिव्य अर्जुन क्वाथ प्रत्येकी एक चमचा घ्यावा आणि ते 400 मि.ली. पाण्यात उकळावे. जेव्हा पाणी 100 मि.ली. शिल्लक राहील तेव्हा ते गार करून उपाशीपोटी प्यावे. हे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा उपाशीपोटी घ्यावे. त्याचबरोबर पतंजली सी बकथॉर्न कॅप्सूल हलक्या गरम पाण्याने सकाळी व संध्याकाळी अन्न घेण्यापूर्वी घ्यावा. दिव्य लिपिडोम टॅबलेट आणि दिव्य लौकी घनवटी टॅबलेट हे हलक्या गरम पाण्याने सकाळी आणि संध्याकाळी अन्न घेतल्यानंतर घ्यावे. संशोधनात दावा करण्यात आला आहे की आयुर्वेदातील हा उपचार प्रयोगांनंतर सिद्ध झाला आहे आणि याचा निश्चित लाभ होतो.