पतंजलीने पहिल्यांदात केली घोषणा, केली सुमारे २,५०० कोटींची कमाई
बीएसईच्या आकड्यांनुसार पतंजली फूड्सच्या शेअरचे भाव अनेक दिवसांपासून वाढले आहेत. आकड्यानुसार कंपनीचा शेअरचे भाव ४.०५ टक्के उसळी घेऊन १,७४३.१५ रुपयांवर बंद झाले आहेत, कंपनीचा शेअर कामकाजाच्या सत्रात १,७५१.७० रुपयांच्या दिवसभराच्या कमाल पातळीवर पोहचला होता.

बाबा रामदेव यांच्या पंतजली फूड्स पहिल्यांदा घोषणा केली आहे की त्यांच्या कंपनीने २,५०० कोटींची कमाई केली आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे. वास्तविक पतंजली फूड्सने पहिल्यांदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची तयारी केली आहे.१७ जुलै रोजी यावर विचार करुन घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीचा शेअर सतत वाढतच आहे. एका क्षणी कंपनीचा शेअर १,७५० रुपयांच्या पार गेला होता. परंतू बाजार बंद होईपर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये चार टक्के वाढ दिसली. त्यामुळे कंपनीचा मार्केट कॅप ( बाजारमुल्य ) २,५०० कोटींवर पोहचले आहे.
कंपनीचा शेअरमध्ये मोठी उसळी
बीएसईच्या आकड्यांनुसार पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये अनेक दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. आकडेवारी नुसार कंपनीचा शेअर ४.०५ टक्के वेगाने वाढत शेअरचा भाव १,७४३.१५ रुपयांवर बंद झाला आहे. कंपनीचा शेअर कामकाजाच्या सत्रात १,७५१.७० रुपयांचा दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर पोहचला होता. कंपनीचा शेअर कामकाज सुरु होताना १,६७५.३५ या भावाने सुरु झाला होता.४ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २,०३०.०० रुपयांसह ५२ आठवड्यांच्या सर्वाच्च पातळीवर पोहचला होता.यामुळे कंपनीचा शेअर रेकॉर्ड हायवरुन १४ टक्के जास्त खाली पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात पतंजली फूड्स शेअरचे भावात आणखीन वाढ पाहायला मिळेल.
सुमारे २,५०० कोटींचा फायदा
कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्याने पतंजली फूड्सचे मार्केट कॅप देखील चांगल्या पद्धतीने वाढलेला पाहायला मिळत असून तो जवळपास २,५०० कोटीवर पोहचला आहे.आकड्यांना पाहाता १४ जुलै रोजी म्हणजे एक दिवस आधी कंपनीचा मार्केट कॅप ६०,७३२.४९ कोटी रुपये पहायला मिळाला होता.जो मंगळवारी शेअरबाजार बंद होईपर्यंत ६३,१९०.२९ कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. याचा अर्थ कंपनीचे मार्केट कॅपमध्ये २,४५७.८ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनीचे टार्गेट लवकरात लवकर मार्केटचा कॅपला ७० हजार कोटीच्या रुपयांच्या पार घेऊन जाणार आहे.
का आली कंपनीच्या शेअरमध्ये वाढ
पतंजली फूड्सच्या शेअरच्या तेजीत ही वाढ उगाच झालेली नाही. लवकरच कंपनी आपल्या शेअरधारकांना मोठे गिफ्ट देणार आहे. माहितीनुसार पतंजली फूड्समध्ये पहिल्यांदा बोनस शेअर करण्याची घोषणा करु शकते. कंपनीने शेअर बाजाराला माहीती देताना सांगितले की कंपनी बोर्ड १७ जुलै रोजी बोनस शेअर जाही करण्यावर विचार करु शकते. बाबा रामदेव यांची परेंट कंपनीने साल २०१९ रोजी रुची सोयाला खरेदी केली होती. जिचे नाव २०२२ रोजी नाव बदलून पतंजली फूड्स असे केले आहे. त्यानंतर कंपनीने ४,३०० कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता.
