तुमच्या दुकानावर लावा Paytm चा साऊंड बॉक्स, जाणून घ्या किंमत आणि प्रक्रिया

| Updated on: Feb 09, 2021 | 1:44 PM

ग्राहकांच्या गर्दीमुळे अनेकदा दुकानात इतकी गर्दी असते की पैसे घेताना गडबड होते. अशात हल्ली ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

तुमच्या दुकानावर लावा Paytm चा साऊंड बॉक्स, जाणून घ्या किंमत आणि प्रक्रिया
Follow us on

मुंबई : जर तुम्ही दुकानदार असाल आणि पेटीएमकडून पैसे घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे अनेकदा दुकानात इतकी गर्दी असते की पैसे घेताना गडबड होते. अशात हल्ली ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दुकानावर ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली आहे. पण गर्दीच्या वेळी खात्यामध्ये पैसे आले का? हे तपासणं खरंतर अशक्य होतं. त्यामुळे आता पेटीएम साऊंड बॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे खात्यामध्ये पैसे येताच तुम्हाला हे कळेल. (paytm sound box price how to install here know how to buy paytm box for online payment)

या साऊंडला लावण्यावरून दुकानदारांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. तो कसा लावायचा? त्यासाठी पेटीएमशी कसा संपर्क साधायचा? यासाठी किती खर्च येतो? अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची उत्तर या बातमीतून तुम्हाला मिळतील.

कसा लावणार पेटीएस साऊंट बॉक्स?

तुम्हालाही जर पेटीएमचा साऊंड बॉक्स लावायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. हा बॉक्स थेट तुमच्या पत्त्यावर येईल. या साऊंड बॉक्समध्ये तुम्हाला दरमहा बिल भरावं लागणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा पैसे भरल्यानंतर तुम्ही तुम्हाला 18 महिन्यांपर्यंत हा बॉक्स वापरू शकता.

काय आहे योजना?

या बॉक्सच्या योजनेत 499 रुपयांमध्ये हा खरेदी करावा लागेल. यानंतर वापरण्यासाठी तुम्हाला दरमहा 125 रुपये द्यावे लागतील. तर तुम्ही एकदाच या योजनेत 1999 रुपये दिले तर 18 महिन्यांकरिता तुम्हाला पैसे भरण्याची गरज नसते. यानंतर 18 महिने रिचार्ज केल्याशिवाय तुम्ही याचा वापर करू शकता.

कार्डमशीनसुद्धा ट्रेंडमध्ये

साऊंड बॉक्सबरोबरच आता लोक पेटीएम कार्ड मशीनसुद्धा वापरत आहेत. यामझ्ये तुम्हाला ग्राहकांकडून कोणत्याही कार्डवर पैसे घेऊ शकता. तसंच यामध्ये छापील बिलंही मिळतं. कॉन्टॅक्टलेस कार्डसह पेमेंटचीही सुविधा सध्या लोक वापरतात. यामध्ये पासवर्डची आवश्यकता नसते. (paytm sound box price how to install here know how to buy paytm box for online payment)

संबंधित बातम्या –

बजेटनंतर शेअर बाजार उसळला, सलग 7 व्या सत्रात सेंसेक्स आणि निफ्टीने मोडला रेकॉर्ड

gold today rate : बजेटनंतर अवघ्या 9 दिवसांत सोनं झालं स्वस्त, पाहा तुमच्या शहरातले आजचे भाव

‘या’ बड्या बँकेत 1 मार्चपासून होणार आहे मोठा बदल, नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

(paytm sound box price how to install here know how to buy paytm box for online payment)