‘या’ बड्या बँकेत 1 मार्चपासून होणार आहे मोठा बदल, नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

1 मार्च 2021 नंतर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही. काही दिवसांआधीच केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) विलीनीकरण करण्याचं स्पष्ट केलं होतं.

'या' बड्या बँकेत 1 मार्चपासून होणार आहे मोठा बदल, नाही करता येणार पैसे ट्रान्सफर
बँक
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 9:46 AM

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये खातं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही. काही दिवसांआधीच केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) विलीनीकरण करण्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर या दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदामधील ग्राहक झाले. यामुळे 1 तारखेपासून विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचे (Dena Bank) IFSC कोड बंद आहेत. म्हणजेच ग्राहकांना आता नवा IFSC कोड आवश्यक असणार आहे. (how to get new ifsc code bank of baroda customers get new ifsc code otherwise you cannot make online transaction)

नाही करू शकणार ऑनलाइन व्यवहार ?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयएफएससी कोड बदलल्यानंतर ग्राहक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. बँक ऑफ बडोदाने (BOB) एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे. 1 मार्च 2021 पासून ई-विजया आणि ई-देना आयएफएससी कोड बंद केले जाणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

ग्राहकांवर काय होणार परिणाम ?

आयएफएससी कोड बंद झाल्यानंतर याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. कारण, कुठल्याही ऑनलाईन व्यवहारासाठी तुम्हाला बँकेचा आयएफएससी कोड लागतो. यामुळे त्वरित तुमचा नवा कोड माहिती करून घ्या अन्यथा 1 फेब्रुवारीपासून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.

तुम्ही SMS द्वारेही IFSC Code शोधू शकता?

IFSC Code तुम्ही मेसेजकरूनही मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला “MIGR <Space> Last 4 digits of the old account number” असा मेसेज करावा लागेल. या मेसेज तुम्ही नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून या 8422009988 वर पाठवा.

मिस्ड कॉल करून आपण हा कोड लागू करू शकता?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयएफएससी कोडशी संबंधित तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर 1800 258 1700 वर कॉल करून थेट बँकेशी बोलू शकता.

आयएएफसी कोड(IFSC Code) म्हणजे काय?

आयएएफसी म्हणजे 11 अंकांचा एक कोड असतो. रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांना हा कोड दिला जातो. अकरा अंकांच्या या कोडचा इलेक्ट्रिक पेमेंटसाठी वापर केला जातो. याच्या सुरुवातीच्या चार अंकांवरुन बँकेचे नाव कळते. यात पाचवा अंक शून्य असतो. नंतरच्या 6 अंकांवरुन बँक शाखेचा कोड कळतो. बँक ऑफ बडोदाचा आयएएफसी कोड BARB ने सुरु होतो.

आयएएफसी कोड(IFSC Code) कसा मिळवाल?

बँकेकडून सिस्टम इंटीग्रेशन दरम्यान ग्राहकांना पाठवलेल्या मॅसेजमध्ये याबाबत माहिती देण्यात आली होती.

1. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन QR Code स्कॅन करा.

2. कस्टमर केअर हेल्प डेस्क क्रमांक 1800 258 1700 वर संपर्क करा किंवा तुमच्या बँक शाखेत जा.

3. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 8422009988 या क्रमांकावर MIGR <SPACE> जुने खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक एसएमएस करा.

या तीन पद्धतीनेही तुम्हाला नविन आयएएफसी कोड (IFSC Code) मिळेल. 1 मार्चपासून या आयएएफसी कोडनेच तुम्ही बँकिंग व्यवहार करु शकता.

नविन MICR Code चे चेक बुक कसे मिळवाल?

नवीन चेक बुकबाबत बँक ऑफ बडोदाकडून सांगितले की, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत MICR Code कोड वाले चेक बुक 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध होतील. तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यामीतूनही चेक बुक मागवू शकता. (how to get new ifsc code bank of baroda customers get new ifsc code otherwise you cannot make online transaction)

संबंधित बातम्या – 

LPG Subsidy : तर संपणार का LPG वरील सबसिडी? तज्ज्ञांनी सांगतिलं खरं गणित

LPG नंतर आता CNG आणि PNG गॅसही महागला, इथे वाचा ताजे दर

तुमच्याही गाडीला मिळेल सनरूफ फीचर, स्वस्तात आहे खास ऑफर

Petrol Diesel Price Today: दिल्लीत पेट्रोल 87 रुपये पार; डिझेल खूप महाग; मुंबईत भाव काय?

(how to get new ifsc code bank of baroda customers get new ifsc code otherwise you cannot make online transaction)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.